Travel : असं म्हणतात ना, देवाचं बोलावणं आलं, की त्या व्यक्तीला त्याच्या दर्शनापासून कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध देवस्थान आहेत. जिथे दर्शनासाठी विविध राज्यातून लोक येतात. या सर्व धार्मिक स्थळांपैकी एक शिर्डीच्या साईबाबांचा महिमा खूप प्रसिद्ध आहे. देशातील अनेक लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक महाराष्ट्रातील शिर्डी आहे, जिथे साई बाबांची समाधी असून सोबत भव्य मंदिर देखील आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी देशभरातून लोक येतात. शिर्डीपासून काही अंतरावर शनि शिंगणापूर आहे, जिथे शनिदेवांचे मोठे मंदिर आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला यायचे असेल तर अवघ्या 6 हजार रुपयांत प्रवास करता येणार आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. जाणून घ्या..


 


कमी बजेटमध्ये सर्व सुविधांसह शिर्डीला जाण्याची संधी


भारतीय रेल्वेच्या IRCTC स्वस्त टूर पॅकेजद्वारे प्रवाशांना देशभर आणि परदेशात विविध पर्यटन ठिकाणी फिरण्याची संधी देते. रेल्वेच्या या मालिकेत IRCTC ने शिर्डीचे स्वस्त टूर पॅकेज आणले आहे. यामध्ये कमी बजेटमध्ये सर्व सुविधांसह शिर्डीला जाण्याची संधी मिळू शकते. IRCTC चे टूर पॅकेज 'देखो अपना देश' अंतर्गत शिर्डी रेल्वे टूर पॅकेजमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.


 


शिर्डी टूर पॅकेज किती दिवसांचे असेल?


शिर्डी टूर पॅकेज 3 रात्री 4 दिवसांचे आहे. ज्यामध्ये शिर्डी तसेच शनी शिंगणापूर येथे दर्शनाची संधी प्रवाशांना मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्ही ट्रेनच्या स्लीपर क्लास, स्टँडर्ड क्लास आणि 3 एसी मध्ये प्रवास करू शकाल.


 


 






 


 


शिर्डी टूर पॅकेज भाडे


भारतीय रेल्वेच्या या टूर पॅकेजमध्ये वेगवेगळे भाडे आहे. 
जर तुम्ही एसी डब्ब्यातून प्रवास करणार असाल तर, एका प्रवाशासाठी 3 AC भाडे 10460 रुपये आहे, 
तर दोघांसाठी 3 AC चे भाडे प्रति व्यक्ती 8170 रुपये असेल. 
जर तीन लोक प्रवास करत असतील तर प्रति व्यक्ती 7780 रुपये द्यावे लागतील. 
मुलांसाठी भाडे 5820 रुपये आहे.


 


कमी पैशात प्रवास करायचा असेल तर...


जर तुम्हाला कमी पैशात प्रवास करायचा असेल तर Standard श्रेणीतील दोन लोकांसाठी भाडे 5690 रुपये आणि तीन लोकांसाठी 5300 रुपये भाडे आहे.


 


पॅकेजमध्ये सुविधा काय?


या टूर पॅकेजमध्ये प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय केली जाणार आहे.
 याशिवाय स्थानिक वाहतूक सुविधाही उपलब्ध होणार आहे. 
IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून भक्त शिर्डी रेल्वे टूर पॅकेज बुक करू शकतात.


 


 


हेही वाचा>>>


Monsoon Travel : आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात 'या' 5 रेल्वे मार्गांवर प्रवास कराच..! हा अनुभव स्वर्गसुखापेक्षा कमी ठरणार नाही


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )