एक्स्प्लोर

Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय

Monsoon eye care tips: पावसाळ्यात स्क्रीन टाइम वाढल्यामुळे 'ड्राय आय'ची समस्या वाढते.

Eye Care Tips in Monsoon: पावसाळ्याच्या आगमनाने कडक उन्हापासून दिलासा मिळतो (Monsoon). पावसामुळे धूळ, धूर (Eye Care Tips) आणि प्रदूषण कमी होऊन वातावरण स्वच्छ होते. हवेत गारवा आणि आर्द्रता वाढते (health). त्यामुळे अनेकांना वाटते की या ऋतूमध्ये डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या कमी होईल. मात्र, प्रत्यक्षात पावसाळ्यात ड्राय आय (डोळे कोरडे पडणे) या समस्येचे प्रमाण वाढताना दिसते.

महाराष्ट्र, मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. अनेकदा दिवसभर पाऊस सुरू असतो. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत अनेकजण घरातूनच काम (Work From Home) करण्यास प्राधान्य देतात. अनेक पालकही जोरदार पावसाच्या दिवशी मुलांना शाळेत पाठवणे टाळतात. पावसाळ्यात घरात अधिक वेळ घालवल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनशैलीत अनेक बदल होतात आणि याच बदलांमुळे डोळे कोरडे पडण्याच्या समस्या वाढतात. घरात राहिल्यामुळे लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. 

केवळ प्रौढच नव्हे तर लहान मुलांचाही स्क्रीन टाइम वाढतो. पावसाळी वातावरणात चित्रपट किंवा वेब सिरीज सलग पाहण्याची सवय अनेकांना असते. त्यातच बंद खिडक्या आणि एअर कंडिशनरचा दीर्घकाळ वापर यामुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो. स्क्रीनकडे एकटक पाहताना आपण पापण्या लवण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर आटतात आणि डोळे कोरडे पडतात. परिणामी डोळे लाल होणे, जळजळ, खाज येणे, डोळे थकणे, ताण जाणवणे आणि सूज येणे अशा समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात डोळ्यांच्या अॅलर्जीचे प्रमाणही वाढते आणि त्यामुळे विशेषतः मुलांमध्ये ड्राय आयची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल? (Eye Care Monsoon Tips)

•सलग आणि दीर्घकाळ स्क्रीनचा वापर टाळा. 
•20-20-20 नियम पाळा – दर 20 मिनिटांनी, 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहा. 
•जाणीवपूर्वक वारंवार पापण्या लवण्याची सवय लावा. 
•स्क्रीन डोळ्यांच्या पातळीपेक्षा किंचित खाली ठेवा, त्यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो. 
•एसी किंवा पंख्याच्या थेट हवेच्या प्रवाहात बसणे टाळा, कारण त्यामुळे अश्रू लवकर आटतात. 
•डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स (कृत्रिम अश्रू) वापरा. 
•दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. 
•डोळ्यांशी संबंधित कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या वाढण्यामागे केवळ ऋतू कारणीभूत नसतो, तर या काळात आपण स्वीकारलेली जीवनशैली हे त्यामागचे प्रमुख कारण असते. वाढलेला स्क्रीन टाइम, एसीचा वापर आणि घरात जास्त वेळ राहण्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे स्वतःमध्ये आणि मुलांमध्ये निरोगी स्क्रीन सवयी विकसित करणे, नियमित विश्रांती घेणे आणि डोळ्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या छोट्या सवयी पावसाळाभर डोळे आरामदायी, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करतील.

डॉ. मीनल कान्हेरे
कॉर्निया, कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन
डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटल, चेंबूर

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Embed widget