Health Tips : निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. विशेषतः उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. निरोगी राहण्यासाठी आपण दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन, ओटीपोटात दुखणे, उलट्या आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत दिवसभर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरासाठी पाणी जितके आवश्यक आहे, तितकेच पाणी पिण्याची योग्य पद्धत जाणून घेणे देखील आवश्यक आहे. आजकाल बहुतेक लोक बाटलीतूनच पाणी पितात. उभे राहून पाणी पिणे, सतत घटाघट पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतो. उभे राहून पाणी पिण्याचे काय दुष्परिणाम आहेत, हे माहीत आहे का?


किडनीवर परिणाम : उभे राहून पाणी प्यायल्यास त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो. अशाप्रकारे पाणी फिल्टर न होता पोटात जाते. यामुळे मूत्राशयात अशुद्धता जमा होते, ज्यामुळे किडनी खराब होते.


फुफ्फुसासाठी हानिकारक : उभे राहून पाणी पिण्याची सवय फुफ्फुसांनादेखील नुकसान पोहोचवते. अशा रीतीने पाणी प्यायल्याने ते झपाट्याने आत जाते आणि अन्ननलिका व विंड पाईपमधील ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. या सवयीमुळे फुफ्फुसाचा आजार होण्याचा धोका वाढतो.


संधिवात : उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखी आणि संधिवाताचा धोका वाढतो. यामुळे गुडघेदुखी होऊ शकते. जेव्हा, आपण उभे राहून पाणी पितो, तेव्हा त्याचा आपल्या हाडांवर दबाव पडतो आणि नुकसान होते. अशा लोकांना नंतर संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता असते.


पचनाचे आजार : जे लोक उभे राहून पाणी पितात, त्यांना पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात. उभं राहून जास्त पाणी प्यायल्याने जास्त दाबाने पाणी अन्ननलिकेपर्यंत पोहोचतं, त्यामुळे अनेक वेळा पोटदुखीची समस्याही सुरू होते.


अॅसिडीटी वाढू शकते : उभे राहून पाणी प्यायल्याने अॅसिड बाहेर पडू शकत नाही, अशा स्थितीत शरीरात अॅसिडची पातळी वाढते. यामुळे कधीकधी पोटदुखी आणि इतर समस्या उद्भवतात. जर, तुम्ही बसून पाणी प्यायले, तर ते आम्ल हळूहळू लघवीतून बाहेर पडते. म्हणूनच डॉक्टर नेहमी खाली बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.