Important days in 7th April : एप्रिल महिना सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 7 एप्रिलचे दिनविशेष.  


इ.स.1827 : साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन वॉकर यांनी शोध लावलेल्या काडीपेटी सर्वप्रथम विक्रीस काढली.


ब्रिटीश संशोधक आणि रसायनशास्त्रज्ञ जॉन वॉकर यांनी बनवलेल्या आगपेटीची (Matchbox) विक्री झाल्याची पहिली नोंद.


1891: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्म. 


सर डेव्हिड अलेक्झांडर सेसिल लो (7 एप्रिल 1891 - 19 सप्टेंबर 1963) हे न्यूझीलंडचे राजकीय व्यंगचित्रकार होते. न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या, त्यांनी 1911 मध्ये सिडनी येथे स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांच्या मूळ देशात काम केले आणि नंतर लंडनमध्ये (1919), जिथे त्यांनी आपली कारकीर्द घडवली तिथे त्यांना कर्नल ब्लिंप चित्रण आणि जर्मन हुकूमशहाच्या व्यक्तिमत्त्वांवर आणि धोरणांवर व्यंगचित्रे केल्याबद्दल प्रसिद्धी मिळवली.  हिटलर आणि मुसोलिनी यांच्या चिथावणीखोर चित्रणांमुळे इटली आणि जर्मनीमध्ये त्याच्या कामावर बंदी घालण्यात आली आणि ब्लॅक बुकमध्ये त्यांचे नाव आले .


1919 : पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय कवी कश्मीरी लाल जाकिर यांचा जन्मदिन.


काश्मिरी लाल जाकीर (7 एप्रिल 1919 - 31ऑगस्ट 2016) हे उर्दू साहित्यातील भारतीय कवी, कादंबरीकार, नाटककार आणि लघुकथा लेखक होते. 1940 मध्ये लाहोरच्या 'दुनिया' या प्रकाशनात प्रकाशित झालेल्या त्यांच्या पहिल्या गझल अदाबीपासून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यांनी अनेक कादंबऱ्या, नाटके, लघुकथा आणि प्रवासवर्णने लिहीली आहेत. जाकीर यांनी तत्कालीन ब्रिटीश भारतात पंजाब शिक्षण विभागात काम केले आणि हरियाणा उर्दू अकादमीचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. हिंदी आणि उर्दूमध्ये लेखन केले आहे. तीन सिहार एकल, एक गझल काव्यसंग्रह, अब मेरे पुत्र दो, एक कादंबरी आणि ए माओ बेवना बेटियो, लेखांचा संग्रह त्यांनी लिहीला आहे. भारतीय साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल, भारत सरकारने त्यांना 2006 मध्ये पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे. 


1920 : भारतरत्‍न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म. 


इ.स. 1920 साली भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त भारतीय संगीत आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे संगीतकार आणि प्रसिद्ध सितार वादक रवी शंकर यांचा जन्मदिन. हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे इसवी सनाच्या विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात. अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्त्य जगतास करून देण्याच्या प्रयत्‍नांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे गिनेस रेकॉर्ड (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) त्यांच्या नावावर आहे.


1940 : पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
इ.स. 1940 साली पोस्टाच्या तिकिटांवर प्रतिमा छापण्यात येणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक ठरले.


1942 : हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म.
सन 1942 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, चित्रपट निर्माते जितेंद्र कपूर यांचा जन्मदिन. जितेंद्र यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे झाला. ते मुंबईत लहानाचे मोठे झाले. हिंमतवाला, धरम वीर, फर्ज, हातिम ताई, तोहफा, नागिन, जुदाई यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. 


1948 : जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना दिन. 


7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना स्थापन करण्यात आली. म्हणूनच हा दिवस जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना विविध उपायोजना करते. जगातील 194 देश या संघटनेचे सभासद आहेत.


1962 : चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा जन्मदिन.   


राम गोपाल वर्मा (जन्म 7 एप्रिल 1962 ) हे भारतीय दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता आहेत. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. त्यांच्या कारकिर्दीत सत्य, भूत, सरकार, डरना मना है, डरना जरूरी है आणि एक हसीना थी या प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे. 'रंगीला', 'सरकार', आणि 'सत्या' सारख्या चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा ठसा उमटवला आहे.     


1977 : चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे यांचे निधन. 


राजा नीळकंठ बढे (जन्म : नागपूर, 1 फेब्रुवारी 1912 - दिल्ली, 7 एप्रिल 1977) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी होते. राजाभाऊंचे प्राथमिक शालेय शिक्षण मध्य प्रदेशात छिंदवाड्याला झाले, तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात. त्यांनी पुण्याच्या दैनिक सकाळमध्ये उमेदवारी केली. नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रमध्ये ते वर्षभर सहसंपादक होते. त्याचवेळी राजा बढे हे नागपूरच्या 'बागेश्वरी' मासिकाच्या संपादक मंडळात होते. तिथून निघून बढे यांनी साप्ताहिक 'सावधान'मध्ये मावकर-भावे यांच्याबरोबर काम केले. त्यांनी 'कोंडिबा' या टोपणनावाने बरेचसे स्फुटलेखन केले आहे. 


1996 : श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत 17 चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम 


सनत टेरान जयसूर्या श्रीलंका या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha