Clove Benefits : प्रथिने, कार्बोहायड्रेट, लोह, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि तांबे यांसारखे घटक लवंगात आढळतात. लवंग दातांपासून ते त्वचेपर्यंत अनेक प्रकारे फायदेशीर आहे. लवंग दातदुखी आणि त्वचेच्या जळजळीसाठी वापरली जाऊ शकते. याशिवाय पचनसंस्था आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही लवंग खूप उपयुक्त आहे. लवंग पाण्यात मिसळून पिण्याचे अनेक फायदे आहेत. याशिवाय, जर तुम्ही पाण्याची बाटली सोबत बाळगत असाल, तर त्यात बाटलीतही लवंग टाकून ते पाणी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला लवंगाचे अनेक फायदेही मिळतात आणि पाण्याला चांगला सुगंधही येतो, चला तर मग जाणून घेऊया लवंगाचे फायदे.
प्रतिकारशक्ती वाढते : लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. हे पाणी संसर्ग आणि फ्लू विषाणूशी लढण्यास मदत करते. लवंगाच्या पाण्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. याव्यतिरिक्त, त्यात मॅंगनीज, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असतात.
डाग दूर होतात : लवंगामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट आढळतात, जे त्वचेचे विकार दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्याच्या वापराने तुमच्या पिंपल्सचे डाग कमी होऊ शकतात. याशिवाय चेहऱ्यावर चमकही येते.
जळजळ कमी होते : लवंगात दाहक -विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे जळजळीपासून आराम मिळतो. याशिवाय त्यात अँटि-ऑक्सिडंट्सही आढळतात, ज्याच्या मदतीने तणाव कमी होण्यासही मदत होते. लवंगाचे पाणी सांधेदुखीतही आराम देते.
मधुमेह नियंत्रित राहतो : लवंगामुळे इन्सुलिन निर्मितीत मदत होते आणि इन्सुलिनच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंगाचे पाणी खूप फायदेशीर आहे.
दातांसाठी फायदेशीर : लवंगाचे पाणी दात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. वास्तविक, लवंगात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. लवंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने तोंडातील प्लाक आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही लवंग बारीक करून, त्यात काळे मीठ मिसळून दातांवर लावू शकता.
अशा प्रकारे करा लवंगाच्या पाण्याचे सेवन :
* तुम्ही पाण्यात लवंग टाकून ते पाणी जेवल्यानंतर पिऊ शकता. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. यासाठी तुम्ही एका ग्लास पाण्यात लवंग भिजत घालून ते पाणी पिऊ शकता.
* सकाळी उठल्यानंतरही तुम्ही लवंगाचे पाणी पिऊ शकता. यामुळे मधुमेहाच्या समस्येवर आराम मिळतो.
* गरम पाण्यात लवंग घालूनही पिऊ शकता. यामुळे दातांच्या समस्यांमध्ये आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha