Bitter Guard Benefits : चवीला कडू असल्यामुळे काहींना कारले खाणे अजिबात आवडत नाहीत. मात्र, कारले जितके कडू तितकेच त्याचे गुणकारी फायदेही आहेत. वास्तविक, कारल्यामध्ये असे अनेक पोषक घटक असतात, जे केवळ मधुमेह बरा करत नाहीत, तर इतर अनेक आजार दूर करतात. अशा परिस्थितीत तुम्हाला कारले आवडो किंवा न आवडो, पण कारल्याचे सेवन जरूर करावे. कारल्याचे सेवन केल्याने तुम्ही इतर समस्यांपासून मुक्त राहू शकता. चला तर, जाणून घेऊया कडू कारल्याने कोणकोणते रोग दूर होतात...


खोल जखमा बऱ्या होतात : अनेक वेळा अशा जखमा होतात, ज्या लवकर बऱ्या होत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत त्या जखमेवर कारल्याचे मूळ चोळा. त्यामुळे जखम लवकर सुकते. अशा प्रकारे जखम लवकर बरी होते. जर, तुमच्याकडे कारल्याची मूळ नसेल, तर तुम्ही कारल्याची पाने बारीक वाटून जखमेवर लावू शकता.


तोंडातील फोडी बऱ्या होतात : अनेकदा उन्हाळ्यात तोंडात फोड येतात, यामुळे खाणे-पिणे कठीण होते. तोंडातील फोडांवर लोक विविध प्रकारचे उपाय करतात, परंतु त्यांचा काही विशेष परिणाम दिसत नाही. अशा परिस्थितीत कारल्याचा रस सर्वात फायदेशीर ठरतो. या फोडावर कारल्याचा रस लावा आणि लाळ बाहेर येऊ द्या. अशा प्रकारे फोडांची समस्या लवकर दूर होईल.


डोकेदुखी दूर होईल : नेहमी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर, कारल्याची पाने बारीक करून कपाळावर लावा. असे केल्याने डोकेदुखीमध्ये त्वरित आराम मिळेल.


मुतखड्याची समस्या दूर होते : कारल्याचा रस प्यायल्याने मुतखड्यांच्या समस्येमध्ये लगेच आराम मिळतो. अशा परिस्थितीत ज्या लोकांना मुतखड्याची समस्या आहे, त्यांनी कारल्याचा रस जरूर प्यावा जेणेकरून त्यांची या समस्येपासून लवकर सुटका होईल.


गुडघेदुखीत फायदेशीर : काही लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो. हे मुख्यतः थकवा, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे किंवा वृद्धत्वामुळे देखील असू शकते. अशा परिस्थितीत गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर, कच्चे कारले विस्तवात भाजून घ्या, नंतर ते कापसात गुंडाळून गुडघ्याला बांधा.  यामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha