Dasara 2023 : आज दसरा (Dasara 2023), रामाने अहंकारी रावणावर विजय मिळवला होता. दसऱ्याला विजयादशमी देखील म्हणतात. या दिवशी भगवान रामाने अहंकारी रावणाचा वध केला. या दिवशी ‘अस्त्र’ ची पूजा केली जाते. तसेच भगवान राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांची देखील पूजा केली जाते. आजच्या दिवशी आपट्याची पानं देखील देण्याची प्रथा आहे. घरोघरी जाऊन 'सोनं घ्या सोन्यासारखे राहा' असं आपण म्हणतो खरं, पण त्यामागचं महत्त्व नेमकं काय हे तुम्हाला माहीत आहे का? याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शस्त्रपूजनासाठी शुभ मुहूर्त
दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी विजय मुहूर्तावर शस्त्रपूजन केलं जातं. यंदा दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच, 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:58 ते 02:43 पर्यंत शस्त्रपूजेचा शुभ मुहूर्त असेल. तर, अभिजीत मुहूर्त हा 24 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 11:43 ते दुपारी 12:28 पर्यंत आहे.
आपट्याच्या पानाचं महत्व
दसऱ्या दिवशी सर्व लोक एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्यांच्या पानांची एक पौराणिक कथा आहे. रघुकुलातील श्रीराम चंद्रांच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती, पण ती त्यांनी दान केली आणि त्यानंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. हे राजे अरण्यात राहत असताना त्यांचे कुलगुरू कौत्स मूनी येथे आले. त्यांनी त्या राजांकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रा दान म्हणून मागितली होती. वास्तविक ते राजे तेव्हा वानप्रस्थाश्रमाला निघाले तेव्हा त्यांच्याकडे धन नव्हते. तरीही गुरुंची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान दिले. पण त्या युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राजांनी मला तुमचं राज्य नको, 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, अशी मागणी इंद्रदेवांकडे केली. तेव्हा इंद्रदेवांनी पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो. त्या तुम्ही वेचून घ्या, असे इंद्रदेवांनी सांगितले. त्याप्रमाणे इंद्रदेवांनी आपट्याच्या पानांच्या रूपाने सोन्याचा वर्षाव केला. त्यामुळे आपट्याचे पान आपण विजयादशमीला सोने म्हणून लुटतो. आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते. अशी आख्यायिका सांगितली जाते असे तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने वाटली जातात.
शेतकऱ्यांचा दसरा (Farmer's Dussehra) :
दसऱ्याला शेतीतील पहिले पीक वाजतगाजत घरी आणून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही गावोगावी पाळली जाते. ह्या नव्या धान्याच्या काही लोंब्या, झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांनी बनविलेल्या तोरणात बांधतात. हे सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते. ह्या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितादेवीची पूजा आणि शस्त्रपूजा हे चार विधी पूर्वी राजे रजवाडे, सरदार करीत असत.
महत्त्वाच्या बातम्या :
Dasara 2023: दसऱ्याच्या दिवशी केलं जातं शस्त्र पूजन; कोणता आहे शुभ मुहूर्त? जाणून घ्या