Rama Raghav : 'रमा राघव' (Rama Raghav) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील रमा आणि राघव यांची लव्हस्टोरीही तितिकीच चर्चेत आहे. आता या मालिकेतून अभिनेते गौतम जोगळेकरांनी (Gautam Joglekar) ब्रेक घेतला आहे.
गौतम जोगळेकरांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ‘रमा राघव’ मालिकेतून ब्रेक घेतल्याची माहिती दिली आहे. रमा आणि राघव यांची लव्हस्टोरीही सध्या तितकीच चर्चेत आहे. सध्या या जोडीच्या लग्नाच्या बोलणीचा उत्कंठावर्धक टप्पा सुरू असताना,रमाच्या वडिलांची भूमिका करणारे नट बदल्ल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
‘रमा राघव’ या मालिकेतील गिरीश परांजपे म्हणजेच रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे गौतम जोगळेकर यांनी वैद्यकीय कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला असं कळतंय. रमा राघवच्या ऑफिशियल पेजवर एक व्हिडीओ पोस्ट झाला आहे, ज्यात गौतम जोगळेकर यांनी मालिकेतून ब्रेक घेतल्याचे सविस्तर कारण सांगितले आहे. तर त्यांच्या जागी आता गिरीश परांजपेंच्या भूमिकेत श्रीरंग देशमुख पाहायला मिळत आहेत.
गौतम जोगळेकरांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
श्रीरंग देशमुख आणि गौतम जोगळेकर हे चांगले मित्र आहेत. या व्हिडीओमधून कारण स्पष्ट होते की, गौतम जोगळेकरांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याची सर्जरी करायची असल्याने त्यांना मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला. गिरीश परांजपे या भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले त्यासाठी त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले. तसेच आता रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे श्रीरंग देशमुख हे त्यांचे मित्र असून त्यांनाही तितकंच प्रेम द्या असं प्रेक्षकांना आवाहन केले आहे.
'रमा राघव' या मालिकेतील खट्याळ रमा आणि प्रेमळ राघव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दोन अतिशय विरुद्ध कौटुंबिक वातावरणातून आलेल्या रमा आणि राघव यांच्यातील संघर्षाची आणि त्यातून पुढे फुलणाऱ्या प्रेमाची तिखट गोड गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. आयुष्यात आदर्श, तत्त्व, मूल्य यांचं महत्त्व नव्या पिढीला हलक्या फुलक्या रितीने पटवून देण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला जात आहे.
संबंधित बातम्या