Ajinomoto Side Effects : स्वयंपाकघरात आढळणारा एक पदार्थ म्हणजे अजिनोमोटो (Ajinomoto). अजिनोमोटोचा वापर प्रामुख्याने चायनीज फूड बनवण्यासाठी केला जातो. कारण अजिनोमोटोशिवाय चायनीज पदार्थाची चव आणि रंग येत नाही. अजिनोमोटो चाऊ मेंपासून मंचुरियन आणि तळलेल्या भातापर्यंत सर्व पदार्थांमध्ये वापरला जातो. अगदी मॅगी मसाल्यातही अजिनोमोटो असतो. अजिनोमोटो हा मोनोसोडियम ग्लुटामेटचा एक प्रकार आहे, ज्याला एमएसजी (MSG) असेही म्हणतात. हा पांढर्या रंगाचा स्फटिक मिठासारखा पदार्थ असून त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. अजिनोमोटोचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. अजिनोमोटोमुळे आरोग्याचं कसं नुकसान होते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
वजन वाढवते
अजिनोमोटोमध्ये सोडियम असते जे पाणी राखून शरीरात द्रव टिकवून ठेवते, ज्यामुळे वजन वाढू शकते. हे भूक कमी करते ज्यामुळे जास्त प्रमाणात खाणे होऊ शकते आणि कॅलरी जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढू शकते.
मायग्रेनचा धोका
मायग्रेनचे कारण म्हणजे अजिनोमोटोमधील सोडियमचे प्रमाण जास्त आहे ज्यामुळे शरीरातील निर्जलीकरण होते. डिहायड्रेशनमुळे थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. जास्त खाल्ल्याने रक्तदाबात चढ-उतार होऊ शकतात. यामुळे मायग्रेन किंवा तीव्र डोकेदुखी देखील होऊ शकते. अजिनोमोटो न्यूरोट्रांसमीटरची पातळी आणि कार्ये बाधित करते. हे त्यांच्या रिसेप्टर्सवर परिणाम करून कार्य करते. त्यामुळे मूड, झोप, भूक आणि इतर कार्यांवर विपरीत परिणाम होतो.
स्नायूंचं दुखणे
जास्त सोडियममुळे देखील सांधे आणि स्नायू दुखू शकतात. अजिनोमोटोच्या सेवनामुळे काही लोकांना पोटात जळजळ, ऍसिडिटी किंवा ऍसिड रिफ्लक्स सारख्या समस्या देखील होतात.
गर्भधारणेदरम्यान हानिकारक
अजिनोमोटोमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते तर गर्भधारणेदरम्यान सोडियम कमी वापरणे चांगले. जास्त सोडियममुळे सूज, उच्च रक्तदाब आणि इतर समस्या उद्भवू शकतात. अजिनोमोटोचा मुलांच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे गर्भपात होणे, गर्भाशयाची वाढ खुंटणे यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे गरोदर महिलांनी चायनीज खाणे टाळावे. त्यामुळे तुम्ही देखील आहारात अजिनोमोटोचा सतत वापर करताय तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :