Olive Oil Benefits : मधुमेहाचे रुग्ण त्यांच्या खाण्यापिण्याबाबत सतत चिंतेत असतात. पुरी-पराठे यासारखे पदार्थ थंडीत खायला खूप चविष्ट असतात. पण, रिफाइंड तेलात शिजवलेले अन्न आरोग्यासाठी हानिकारक असते. अशावेळी नेहमीच्या रिफाइंड तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) वापरावे. ऑलिव्ह ऑईल हे पचनास अतिशय हलके आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईलमध्ये पदार्थ बनवल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.


ऑलिव्ह ऑईलमध्ये फायबर, साखर, कॅलरीज आणि कर्बोदकांचे प्रमाण फारच कमी असते. यामुळेच ऑलिव्ह ऑईल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात खूप मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांनी ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेले अन्न खावे. ऑलिव्ह ऑइलमध्ये ऑलिओप्रोपीन हा घटक असतो, जे ऑलिव्हमधील सर्वात शक्तिशाली पॉलिफेनॉल आहे. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे शरीराला अनेकप्रकारे लाभदायी ठरते. या तेलामध्ये आढळणारे पॉलिफेनॉल रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ऑलिव्ह ऑईलचा आहारात समावेश केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि टाईप 2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो.


ऑलिव्ह ऑईलचे फायदे (Health Benefits of olive oil):


* ऑलिव्ह ऑईलमध्ये पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, अँटिऑक्सिडंट्समुळे इन्सुलिन स्राव वाढवण्यास मदत होते. यामुळेच ऑलिव्ह ऑईल मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.


* रोज ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यास कॅन्सरचा धोकाही कमी होतो. ऑलिव्ह ऑईलमध्ये अशी अनेक संयुगे आढळतात, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात.


* ऑलिव्ह ऑईल हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट आणि पोटासाठी खूप चांगले मानले जाते. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट भरपूर असते. अशा स्थितीत ऑलिव्ह ऑईल रोज वापरल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.


* ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन के, ओमेगा-3 आणि 6 फॅटी अॅसिड, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि ते हृदयासाठीही फायदेशीर असते.


* ऑलिव्ह ऑईल मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय ऑलिव्ह ऑईलमुळे टाईप-2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो.


* ऑलिव्ह ऑईलने डोळ्यांखाली हलका मसाज केल्यानेही खूप फायदा होतो. यामुळे थकवा दूर होतो आणि झोपही चांगली लागते.


* ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोकाही खूप कमी होतो. ऑलिव्ह ऑईलमध्ये पॉलिफेनॉल आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात, जे रक्तदाब नियंत्रित करतात.


* ऑलिव्ह ऑईलच्या वापराने अल्झायमरसारख्या स्मरणशक्तीच्या समस्यांचा धोकाही कमी होतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha