Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायामासोबतच तुमच्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही खाण्यापिण्याची काळजी घेतली तर लवकरच तुमचे शरीर फीट राहील. वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता. जेवणात मधाचा समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. मधामुळे तुमच्या आरोग्यालाही अनेक फायदे मिळतील. लसूण, ताक किंवा दुधात मध मिसळून प्यायल्यानेही पोटाची चरबी कमी होते. आज आम्‍ही तुम्‍हाला मधाच्‍या वापराच्‍या 5 पद्धती सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.


वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मध :


1. लिंबू आणि मध- वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबूपाणी सर्वात प्रभावी आहे. यासाठी कोमट पाण्यात मध आणि त्यात अर्धा लिंबू मिसळलेले पाणी प्या. सकाळी हे पाणी प्यायल्याने लवकर परिणाम दिसून येतो. बरेच लोक फक्त मध आणि गरम पाणी पितात. त्यामुळे चरबी झपाट्याने कमी होते.


2. लसूण आणि मध - लसूण खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला सकाळी लसणाच्या २-३ पाकळ्या खायच्या असतील तर आधी त्याची पेस्ट बनवा. त्यामध्ये 2 चमचे मध मिसळून कोमट पाण्याने प्या. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच, वजनही कमी होते.  


3. दूध आणि मध -  जर तुम्हाला बारीक व्हायचे असेल तर दुधात साखरेऐवजी मध वापरा. लक्षात ठेवा की फक्त उकळलेल्या दुधात मध घाला. दुधात एक ते दोन चमचे मध मिसळून तुम्ही पिऊ शकता. यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत होईल.


4. ब्राऊन ब्रेड आणि मध - जर तुम्हाला लवकर भूक लागत असेल तर तुम्ही ब्राउन ब्रेड आणि मध खाऊ शकता. यामुळे तुमचे पोटही भरले जाईल आणि कॅलरीजही कमी प्रमाणात शरीरात जातील. तुम्ही हे नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकता.


5. ताक आणि मध - काही लोक पोटाची चरबी कमी करण्यासाठी ताक पितात. ताकात मध घालून प्यायल्यास तुमची चयापचय क्रिया सुधारते. एक ग्लास ताकामध्ये तुम्ही 2 चमचे मध टाकू शकता. यामुळे पोटाची चरबी कमी होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha