Coconut Oil : खोबरेल तेल (Coconut Oil) आज नाही, तर प्राचीन काळापासून अनेक प्रकारे वापरले जाते. खोबरेल तेल तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. खोबरेल तेल त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. यामध्ये मुरुमं, स्ट्रेच मार्क्स आणि कोरडे रुक्ष केस या समस्यांचा समावेश होतो.


नारळाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हिवाळ्यात त्वचा मुलायम ठेवण्यात देखील याची मदत होते. मासिक पाळीच्या वेळी नाभीला नारळाचे तेल लावल्याने आराम मिळतो. जाणून घेऊया खोबरेल तेल केस आणि त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे, ते जाणून घेऊया...


केसांसाठी खूप फायदेशीर!


खोबरेल तेल तुमच्या केसांसाठी खूप लाभदायी आहे. हे तेल केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून काम करते. त्यांना लांब, मजबूत आणि मऊ बनवते. केस गळणे, कोंडा होणे आणि केसांच्या इतर अनेक समस्यांमागे कोरडे केस हे एक सामान्य कारण आहे. खोबरेल तेल हे केसांच्या या सर्व समस्यांवर उत्तम उपाय आहे. खोबरेल तेल एक उत्तम कंडिशनर आहे आणि ते तुमच्या केसांना आवश्यक असणारे कंडिशनिंग देते. अनेकांना माहित नसेल पण बाजारात उपलब्ध असलेली अनेक कंडिशनर तयार करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. कुरळ्या केसांसाठी देखील खोबरेल तेल एक उत्तम उपाय आहे. यासाठी तेल गरम करा आणि त्याने केसांना मसाज करा.


त्वचा बनवेल सुंदर!


खोबरेल तेल तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम बनते. हे तेल तुमच्या त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. खोबरेल तेल त्वचा कोरडी आणि निस्तेज होण्यापासून प्रतिबंधित करते. काही मिनिटे खोबरेल तेलाने चेहऱ्याला हलके मसाज करा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवावे. यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. नारळ तेल एक उत्कृष्ट मेकअप रिमूव्हर म्हणून देखील काम करते. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या मेकअप रिमूव्हर्सऐवजी तुम्ही मेकअप काढण्यासाठी खोबरेल तेल वापरू शकता. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha