एक्स्प्लोर

Coconut Barfi Recipe : बाप्पाला द्या गोड पदार्थांचा नैवेद्य; जाणून घ्या ओल्या नारळाची बर्फी बनवण्याची रेसिपी

Coconut Barfi : ओल्या नारळाची बर्फी बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...

Coconut Barfi Recipe : 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष सध्या सर्वत्र आहे. बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आता येत्या दोन दिवसांत बाप्पा निरोप घेणार आहे. त्यामुळेच बाप्पासाठी आता वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जात आहे. पण तेच तेच पदार्थ बनवून गृहिणींना कंटाळा आला आहे. त्यामुळे आज जाणून घ्या ओल्या नारळाची बर्फी (Coconut Barfi)  बनवण्याची सोपी पद्धत...

ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य - 

  • खवा - 250 ग्रॅम
  • साखर - 250 ग्रॅम
  • खोवलेला नारळ - 2 वाटी
  • कोको पावडर - 2 चमचे
  • स्ट्रॉबेरी इसेन्स - अर्धा छोटा चमचा
  • वेलची पूड - 1 छोटा चमचा
  • तूप - 1 चमचा
  • चांदीचा वर्थ

ओल्या नारळाची बर्फी बनवण्याची कृती

- बर्फी बनवण्याआधी सगळ्यात आधी कढईत तूप घालून खवा परतून घ्यावा.
- खव्यात खोवलेला नारळ घालावा. 
- दरम्यान दुसरीकडे साखरेचा पाक बनवून घ्यावा. 
- साखरेच्या पाकात खवा आणि नारळाचं मिश्रण घालावं. 
- साखरेचा पाक, खवा, नारळाचं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं. 
- तयार झालेल्या मिश्रणाचे तीन समान भाग करून घ्यावेत. 
- एका भागात कोको पावडर, दुसऱ्या भागात स्ट्रॉबेरी इसेन्स आणि तिसऱ्या भाग पांढरा ठेवावा. 
- ताटाला तुपाचा हात लावून कोकोचं मिश्रण थापून घ्यावं. 
- त्यावर पांढरा भाग थापावा. 
- त्यानंतर स्ट्रॉबेरीचं मिश्रण थापून घ्यावं. 
- त्यावर चांदीचा वर्ख लावावा. 
- थापलेलं मिश्रण गार करून घ्यावं. 
- मिश्रण गार झालं की त्याच्या वड्या कापून घ्याव्या. 

कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे. घरोघरी जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. आता दोन दिवसात बाप्पा आपला निरोप घेणार आहे. त्यामुळे सध्या बाप्पासाठी गोडा-धोडाचे पदार्थ बनवण्यात येत आहे. घरोघरी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

संबंधित बातम्या

Sanjori Recipe : बाप्पासाठी दररोज कोणता नवीन पदार्थ बनवायचा विचार करताय? जाणून घ्या सांजोरी बनवण्याची रेसिपी

Lavang Latika Recipe : लाडू, मोदक, खीर खाऊन कंटाळलात? जाणून घ्या 'लवंग लतिका' बनवण्याची रेसिपी

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Embed widget