Child Mobile Addiction :  स्मार्टफोनचा वापर आपल्या आजूबाजूला इतका वाढला आहे की, वयोवृद्ध तर सोडाच, आता छोट्या हातातही मोबाइल दिसू लागला आहे. लहान मुले मोबाइलवर कार्टूनसह ऑनलाइन गेमिंगचा आनंद घेतात, परंतु ही मजा मुलांसाठी मोठी महागात पडू शकते. मोबाइलचा अतिवापर अनेक प्रकारे हानिकारक आहे. ज्यामध्ये मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मुलांनी जास्त मोबाईलचा वापर केला तर त्यांची दृष्टी कमी होऊ शकते, असा दावा अनेक अभ्यासात करण्यात आला आहे. याचबरोबर मुले चिडचिडे होऊ शकतात आणि त्यांना चिंता, नैराश्य आणि आत्मसंशय यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. तर येथे आम्ही तुम्हाला मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवता येईल हे सांगणार आहोत.


शारीरिक अॅक्टिविटीज करण्यास प्रोत्साहित करा


मुलांना मोबाइलपासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना शारीरिक हालचाली आणि मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित केले पाहिजे. मुले जेवढी घराबाहेर खेळतील तेवढा त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होईल आणि मुलं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमतील. 


मुलांंच्या मौजमजेसाठी दुसरं काहीतरी निवडा...


मुलं आपल्या मनोरंजनासाठी फोनचा वापर करतात. मनोरंजनासाठी मुलाला मोबाईल दिला, तर तो टाइमपाससाठी नेहमी फोनमध्ये गुंतलेला असेल. अशा वेळी मुलांना टीव्ही, पुस्तके वाचण्यासाठी आणि स्पीकरवर गाणी ऐकण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासोबतच त्याला वेगवेगळ्या कला शिकवायला हव्यात किंवा त्याचे क्लासेस लावून द्यायला हवेत. 


मोबाइलऐवजी कम्प्युटर किंवा लॅपटॉप द्या !



मुलांना अभ्यासासाठी इंटरनेटची गरज असेल तर त्यांना मोबाइलऐवजी कम्प्युटर किंवा लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत. लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर तुम्ही मुलांच्या अॅक्टिव्हिटीवर चांगली नजर ठेवू शकता आणि यामुळे मुलांच्या आरोग्याला फायदा होईल आणि मुलं नेमकं काय पाहतात? ते इंटरनेटवर काय करतात? यावर नजर राहिल. पण त्याचा स्क्रीन टाईम देखील कमी ठेवा.


स्क्रीन टाईम कमी करा...



मुलांचा शारिरीक आणि बौद्धिक विकास होत असताना त्यावेळी दोन वर्षापर्यंतच्या मुलांनी स्क्रीन टाळणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे, 24 ते 59 महिन्यादरम्यानच्या मुलांनी स्क्रीनचा मर्यादित वापर करावा किंवा मोबाईल ठराविक काळापुरतीच वापरावी असा सल्ला देण्यात आला. पाच ते दहा वर्षाच्या मुलांनी दिवसातून किमान दोन तासच स्क्रीनच्या माध्यमांचा वापर करावा. स्क्रीन टाइम हा तात्पुरता असायला हवा. अन्यथा मैदानी खेळ, पुरेशी विश्रांती, कुटुंबातील वेळ, अभ्यास, तसेच कौशल्य विकासाच्या दृष्टीच्या गोष्टी बाजूला पडून त्यांची जागा स्क्रीन टाइमने घेता कामा नये. अन्यथा ते आरोग्याच्या दृष्टीने तोट्याचे आहे. अनेकदा डिजिटल माध्यमे वापरताना त्यातील कोणती गॅजेट्स हानीकारक आहे याची मुलांना ओळख झाली पाहिजे. शैक्षणिक कारणांच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींचा वापर होऊन त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुलांमध्ये खेळते, शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करणे ही पालकांची मोठी जबाबदारी आहे, असं त्या सांगतात.