Fighter Teaser Out:  'फायटर' (Fighter) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनेत्री आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत.  अशातच  'फायटर' या चित्रपटाचा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमधील अॅक्शन सीन्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


कलाकारांच्या लूकनं वेधलं लक्ष  (Fighter Teaser Release)


'फायटर' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज चित्रपटाचा टीझर रिलीज  केला आहे.  या 1 मिनिट 13 सेकंदाच्या टीझरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या दमदार लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  टीझरमध्ये हृतिक रोशन हा हातात राष्ट्रध्वज घेऊन हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहे. या सीनच्या बॅकग्राऊंडला वंदे मातरम हे संगीत ऐकू येते.


हृतिक-दीपिकाची केमिस्ट्री


'फायटर' या चित्रपटाच्या टीझरमध्ये हृतिक आणि दीपिकाची  जबरदस्त केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. या दोघांचा लिप-लॉक सीन देखील टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. दीपिकानं फायटर या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं, "फायटर फॉरेवर" 


पाहा टीझर:






चित्रपटामधील कलाकारांच्या भूमिका (Fighter Star Cast)


 'फायटर' या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात हृतिक हा  स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया उर्फ ​​पॅटी या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण ही स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ ​​मिनी ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर हे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन राकेश जयसिंह उर्फ ​​रॉकी या दमदार भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


कधी रिलीज होणार चित्रपट? (Fighter Release Date)


सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटर हा चित्रपट  25 जानेवारी 2024 रोजी  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद यांच्या 'वॉर', 'बँग बँग' या चित्रपटांचं अनेकांनी कौतुक केलं. आता फायटर  या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या: