Google Playstore Delete17 apps :   गुगल प्ले स्टोरने थेट  17 अॅप्स डिलीट केले आहेत. हे अॅप्स लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचं समोर आल्यानंतर हे अॅप्स गुगल प्लेस्टोअरवरुन हटवण्यात आलेत.  ईएसईटीच्या संशोधकांना गुगल प्लेस्टोअरवर असे 17 अ ॅप्स सापडले जे चुकीच्या पद्धतीने लोकांचा वैयक्तिक डेटा चोरत होते आणि आर्थिक फसवणूक देखील करत होते. भारतासह इतर देशांमध्ये लोक या अॅप्सचा वापर करत होते. तुम्हीही हे अ ॅप्स वापरत असाल तर ते ताबडतोब डिलीट करा. ईएसईटीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हटवण्यापूर्वी हे अॅप्स 12 Million लोकांनी डाऊनलोड केले होते.

अनेक स्पायलोन अ ॅप्सचा पर्दाफाश करणारे ईएसईटीचे संशोधक लुकास स्टेफान्को म्हणाले की, या अॅप्सच्या माध्यमातून सायबर भामटे लोन अॅप्सवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना टार्गेट करतात. ते म्हणाले की, लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांची वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी अनेक मार्गांचा वापर करतात. हे लोक लोन अॅपच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल आणि जीवे मारण्याची धमकीही देत होते. प्रामुख्याने मेक्सिको, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम, भारत, पाकिस्तान, कोलंबिया, पेरू, फिलिपाईन्स, इजिप्त, केनिया, नायजेरिया आणि सिंगापूर मध्ये ही अॅप्स ऑपरेट केली जात होती.

Google Playstore Ban17 apps : 'या' अॅप्स प्लेस्टोअरवरुन  हटवल्या!

AA KreditAmor CashGuayabaCashEasyCreditCashwowCrediBusFlashLoanPréstamosCréditoPréstamos De Crédito-YumiCashGo CréditoInstantáneo PréstamoCartera grandeRápido CréditoFinupp Lending4S CashTrueNairaEasyCash

जास्त व्याज अन् त्यानंतर धमक्या

युजर्सला ब्लॅकमेल करणे, जीवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच या लोकांनी कर्जावर ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त व्याज ही आकारले आणि लोकांना त्रास दिला, असं अहवालात म्हटले आहे. काही परिस्थितीत लोकांना कर्ज परतफेडीसाठी 91  दिवसांऐवजी 5 दिवसांची मुदत देण्यात आली आणि कर्जाचा वार्षिक खर्च (टीएसी) 160 टक्के ते 340 टक्क्यांदरम्यान होता. हे अ ॅप्स डाऊनलोड करताना युजर्सकडून अनेक परवानग्या घेण्यात आल्या होत्या, जेणेकरून डिव्हाइसवर सेव्ह केलेली माहिती अॅक्सेस करता येईल.

सायबर भामट्यांचा धुमाकूळ

सध्या सगळीकडे सायबर भामट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहे. त्यात या अॅप्सचादेखील समावेश आहे. तुम्ही जर यापैकी कोणतं अॅप डाऊनलोड केलं असेल तर लगेच डिलीट करा. 

इतर महत्वाची बातमी-

New Cars in December 2023 : डिसेंबरमध्ये भारतात होणार 'या' दोन कारची ग्रँड एन्ट्री; पाहा स्पेसिफिकेशन डिटेल्स

Year End Offers On Hyundai Cars: डिसेंबर महिन्यात कार खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करा; ह्युंडाईच्या 'या' कारवर बंपर ऑफर्स