एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी खेळा व्हिडिओ गेम'
न्यूयॉर्क : सध्याच्या धावपळीच्या जगात अनेकजण नैराश्येच्या गर्तेत सापडतात. यामधून काहीजण आत्महत्येचाही मार्ग पत्करतात. पण आता नैराश्येतून बाहेर पडण्यावर डॉक्टरांनी उत्तम पर्याय सुचवला आहे. नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी संशोधनकर्त्या डॉक्टरांनी व्हिडिओ गेम खेळण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टरांनी याबाबतचे संशोधन केलं आहे. या संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षातून डॉक्टरांनी हा सल्ला दिला आहे. याबाबत माहिती देताना, विद्यापीठाच्या सुबुही खान म्हणाल्या की, ''सावधगिरीने तयार करण्यात आलेले प्रेरक संदेशाच्या उपयोगातून नवा संदेश मिळतो. हा संदेश मानसिक आरोग्यासाठी व्हिडिओ गेम अधिकाधिक व्यवहारी पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकत असल्याचं सुचवतो.''
संशोधकांच्या टीमने जैविक कारणांमुळे घडणाऱ्या मानसिक बदलांना नैराश्येचं मुख्य कारण सांगितलं आहे. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींना व्हिडिओ गेमवर आधारित अॅप त्यांच्या मेंदूला प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात आलं. यानंतर त्यांच्या नैराश्येवर नियंत्रण मिळवता येत असल्याचं आढळून आलं.
पण असे असले तरी नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी व्हिडिओ गेमच्या वापराचा प्रभाव तात्विक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यातून दीर्घकालिन परिणाम साध्य होत नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डॉक्टरांचा हा शोध 'कॉम्प्यूटर्स इन ह्यूमन बिहेविअर'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement