Butter Milk Benefits : बाहेर अतिशय उष्ण तापमान आहे. या रणरणत्या उन्हात बाहेर पडणे देखील कठीण वाटू लागले आहे. अशा काळात जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा काहीना काही थंड पिण्यासाठी विकत घेतोच. अशा वेळी लोक सहसा कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडायुक्त पेय विकत घेतात. मात्र, ही पेय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहेत. अशावेळी कोल्ड ड्रिंक पिण्याऐवजी ताक पिणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ताकामध्ये शरीर थंड ठेवण्यासोबतच अनेक औषधी घटक देखील असतात.
ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. ताकाच्या सेवनाने शरीरातील चरबी देखील कमी होते. इतकेच नव्हे तर, ताक त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. ताकात व्हिटामिन B 12 , कॅल्शियम, पोटेशियम आणि फॉस्फरससारखे घटक असतात, असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ताक शरीरातील उष्णता त्वरित कमी करून, शरीराला आतून थंड करते.
ताक पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे जाणून घेऊया...
* ताकाच्या सेवनाने लठ्ठपणा कमी होतो.
* वारंवार लघवीचा त्रास होत असेल, तर ताकात मीठ टाकून प्यावे. यामुळे त्रास कमी होतो.
* तोंडात फोडी येत असल्यास ताकाने गुळण्या करव्यात. आराम मिळेल.
* ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
* ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी मार्गात होणारी जळजळ बंद होते.
* जायफळ पूड ताकात मिसळून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
* रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखीत देखील आराम मिळतो.
* पित्ताचा त्रास होत असल्यास ताकात साखर आणि काळी मिरी मिसळून प्यावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :