एक्स्प्लोर

Health Tips : सकाळच्या नाश्त्याला कधीही नाही म्हणू नका; कर्करोगासह 'या' आजारांपासून होईल संरक्षण

Health Tips : जर तुम्ही नाश्ता करत नसाल तर ही परिस्थिती फार गंभीर होऊ शकते. कारण नाश्ता न केल्याने तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.

Health Tips : आजच्या धावपळीच्या काळात आपण इतके बिझी झालो आहोत की आपल्या तब्येतीकडे आपण अगदी सहजपणे दुर्लक्ष करतो. निरोगी शरीरासाठी तुमचा आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही काय खाता, किती प्रमाणात खाता, कोणत्या वेळी खाता या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आहार म्हटलं की, सकाळचा नाश्ता हा आलाच. तुम्ही जर सकाळचा अगदी भरपेट नाश्ता केला तर तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. काम करण्याची ऊर्जा मिळते. पण अनेकदा कामाच्या धावपळीत हा नाश्ता विसरतो. ऑफिसला जाण्यासाठी प्रवास करावा लागतो त्यामुळे शरीर लवकर थकतं. याचं मुख्य कारण सकाळी नाश्ता न करणं. यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.  

सकाळचा नाश्ता कॅन्सरपासून बचावासाठी महत्त्वाचा

खरंतर, एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, जी व्यक्ती सकाळी नाश्ता करते, त्या व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. कॅन्सर हा असा आजार आहे, ज्यामुळे जगभरात लाखो लोक मरतात. भारतातही मोठ्या प्रमाणात लोक या आजाराला बळी पडतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने वेळेवर नाश्ता केला तर त्याला कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. यासोबतच तो अनेक आजारांपासूनही सुरक्षित राहतो.

अभ्यासात काय म्हटले होते?

अभ्यासानुसार, जर एखाद्या व्यक्तीने नाश्ता केला नाही तर त्याची संसर्गाशी लढण्याची शक्ती कमी होते. यामुळे व्यक्ती हृदयविकारापासून कर्करोगापर्यंतच्या आजारांना बळी पडू शकते. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे सांगण्यात आले की, नाश्ता न केल्याने मेंदूमध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया होतात, ज्याचा रोगप्रतिकारक पेशींवर नकारात्मक परिणाम होतो. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
Jointpain in Monsoon: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या
पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या
Oral Cancer: तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा
तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा
Arthritis Symptoms, Causes And Prevention: तरुणांमध्ये संधिवाताची वाढती समस्या; सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित केल्यात भोगावे लागतील गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
तरुणांमध्ये संधिवाताची वाढती समस्या; सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित केल्यात भोगावे लागतील गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget