Vertigo Treatment : आपल्या दमदार अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडणारा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा देखील एकेकाळी एका आजाराच्या सावटाखाली आला होता. वास्तविक, हा आजार स्वतःच चक्कर येतो. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आयुष्मानने स्वत: त्याच्या आजाराबाबत खुलासा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सहा वर्षांपूर्वी आयुष्मान खुरानाला व्हर्टिगो (Vertigo) नावाचा आजार झाला होता. आजही मला कधीकधी व्हर्टिगोच्या लक्षणांचा सामना करावा लागतो असे आयुष्मानने म्हटले होते. त्याला चक्कर येणे यांसारख्या समस्या भेडसावत होत्या. मात्र, व्हर्टिगो हा आजार नेमका काय आहे? तसेच, या आजाराची लक्षणं कोणती या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

  


व्हर्टिगो आजार म्हणजे नेमकं काय? 


व्हर्टिगोमध्ये, रुग्णाला त्याच्या सभोवतालच्या गोष्टी फिरताना दिसतात. भोवळ येणे, डोकं गरगरणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात. तसेच, जर संबंधित व्यक्ती एका ठिकाणी बसली असेल तर त्या व्यक्तीला आजूबाजूच्या सर्व वस्तू आणि माणसं फिरताना दिसतात. व्हर्टिगो हा क मानसिक आजार आहे. 


व्हर्टिगो आजाराचे दोन प्रकार आहेत


व्हर्टिगो आजार हा दोन प्रकारात दिसून आला आहे. पेरिफेरल व्हर्टिगो. ज्यामध्ये आतील कानात किंवा वेस्टिब्युलर नर्व्हमध्ये काही प्रकारची समस्या असते. कानात जास्त संसर्ग झाल्यास ही समस्या पेरिफेरल वर्टिगो बनते. वेस्टिब्युलर नर्व्ह शरीराचा समतोल राखण्याचे काम करते. व्हर्टिगोच्या दुसऱ्या प्रकाराचे नाव सेंट्रल व्हर्टिगो. हा आजार स्ट्रोक, ब्रेन ट्यूमर, मायग्रेन, इन्फेक्शन, डोक्याला गंभीर दुखापत यामुळे होऊ शकतो. 


व्हर्टिगोची लक्षणे काय आहेत? 


चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधार येणे, जास्त घाम येणे, अशक्तपणा जाणवणे, मोठा आवाज ऐकू न येणे, तोल राखण्यात अडचण, तीव्र डोकेदुखी, श्रवणशक्ती कमी होणे, उंची कमी होणे, पडल्यासारखे वाटणे यांसारखी लक्षणं दिसू लागतात.


व्हर्टिगो आजारावर उपचार काय? 


व्हर्टिगोचा झटका आल्यास डॉक्टरांकडून नेहमी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, योगासने हा देखील यावर एक उपाय आहे. योगासने केल्याने मेंदूचे संतुलनही सुधारते. मोठ्या आवाजात किंवा मेंदूला त्रास होत असेल अशा कोणत्याही ठिकाणी जाणे टाळावे. जर समस्या वाढत असेल तर लगेच मानसोपचार तज्ज्ञांना भेटा.  


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : गोवर आणि कांजण्या यामध्ये नेमका फरक काय? संसर्ग झाल्यास कशी काळजी घ्याल? वाचा तज्ज्ञांचा सल्ला