Nail Paint Remover : लग्न, पार्टी किंवा कोणत्याही लहान-मोठ्या फंक्शनला जायचे असेल तर मुली आणि महिला या मेकअप करतात. चेहऱ्याच्या मेकअप प्रमाणेच त्या नखांचा मेकओव्हर देखील करतात. काही महिला मेनिक्युअर करतात. कारण त्यामुळे नखे अधिक सुंदर,  लांब दिसतात. नेलपॉलिश लावलेली नखं  हात आणि पायांचे सौंदर्य वाढवतात. अनेक जण ड्रेसला मॅच करणारी नेलपॉलिश लावतात. अनेक वेळा नेलपॉलिश काठण्यासाठी नेलपेंट रिमूव्हरचा वापर केला जातो. पण या नेलपेंट रिमूव्हरच्या वासाचा त्रास काही लोकांना होतो. नेलपेंट रिमूव्हरचा वापर न करता नेलपॉलिश काढायची असेल तर या घरगुती टिप्स फॉलो करा.

परफ्यूमने नेलपॉलिश निघून जाईल

परफ्यूम हे नेलपॉलिश रिमूव्हर सारखं काम करते. थोड्याशा कापसात परफ्यूम लावून नखांवर चोळा. नेलपॉलिश काही वेळात निघून जाईल.

अल्कोहोलचा करा वापर

तुमच्या अल्कोहोल असेल तर ती कापसात घेऊन नखांवर हलक्या हाताने चोळा. असे केल्याने नेलपेंट सहज निघून जाईल.

टूथपेस्टचा करा वापर

टूथपेस्टमध्ये असलेले इथाइल एसीटेट काही मिनिटांत नेलपेंट काढून टाकते. नेलपॉलिश रिमूव्हरमध्ये देखील इथाइल एसीटेटचा वापर केला जातो.व्हिनेगरमध्ये अॅसिड असते. ते वापरण्यासाठी त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि नंतर कापसाच्या मदतीने नखांवर लावा, यामुळे नेलपॉलिश निघून जाते.

अशी घ्या नखांची काळजीनखं वाढली की कापा वापरायच्या आधी आणि नंतर नेल्स ग्रूमिंग टूल धुवा. नखांची आतली बाजू पाण्यानं धुवा. आर्टिफिशियल नखांचा वापर जास्त वेळ करु नका. ज्या हात्यांच्या नखांना नेलपेंट लावली आहे, त्या हातानं जेवण करु नका. नेलपेंट रिमूव्हर चांगल्या ब्रँडचे वापरा. नेलपेंट काढल्यानंतर नखांना खोबऱ्याचं तेल लावा. 

नेल फायलरचा अती वापर टाळा. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या इतर बातम्या :