Nail Hygiene Tips : अनेक महिलांना नखं (Nails) वाढवण्याची सवय असते. नखं वाढवून त्यांना वेगवेगळ्या रंगांच्या नेल पेंट्स लावायला अनेकांना आवडतं. जास्त नखं वाढवली तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो. नखं स्वच्छ न केल्यामुळे आणि नख न कापल्यानं, बाहेरील घाण, जंतू आणि धूळ त्यामध्ये जाऊ शकते. तुम्हाला पिनवॉर्म हा इन्फेक्शनचा प्रकार होऊ शकतो. जाणून घेऊयात नखं वाढवल्यानं आरोग्यावर होणारे वाईट परिणाम...


पिनवर्म हे इन्टेंटिनल वार्म इन्फेक्शनचा एक प्रकार आहे. हे इफेक्शन नखातील खाण पोटात गेल्यावर होते. ज्यांची नखे बोटांच्या टोकापासून 3 मिमी पर्यंत लांब आहेत, त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कारण नखांमध्ये जंतू असतात. त्यामुळे पिनवर्म्स आणि इतर आजार होण्याचा धोका वाढतो. हात नीट न धुतल्यामुळे हे बॅक्टेरिया नखांमध्ये राहतो. नंतर तो पोटात जाऊ शकतो. त्यामुळे नख वाढल्यानंतर ती कापावीत


अशी घ्या नखांची काळजी
नखं वाढली की कापा 
वापरायच्या आधी आणि नंतर नेल्स ग्रूमिंग टूल धुवा. 
नखांची आतली बाजू पाण्यानं धुवा. 
आर्टिफिशियल नखांचा वापर जास्त वेळ करु नका. 
ज्या हात्यांच्या नखांना नेलपेंट लावली आहे, त्या हातानं जेवण करु नका. 
नेलपेंट रिमूव्हर चांगल्या ब्रँडचे वापरा. नेलपेंट काढल्यानंतर नखांना खोबऱ्याचं तेल लावा. 


नेल फायलरचा अती वापर टाळा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हेही वाचा: