8th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 8 जून चे दिनविशेष.


1992 : जागतिक महासागर दिन 


जागतिक महासागर दिन जगभर 8 जून रोजी पाळला जातो. 2008 सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविण्यात आले. त्यापूर्वी 1982 सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. केनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था,मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या संस्था; अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात. 


1670 : पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.


1707 : औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.


1948 : एअर इंडिया ची मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली.


1957 : चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म.


डिंपल चुन्नीभाई कापडिया या भारतीय चित्रपटअभिनेत्री आहेत. वयाच्या 16व्या वर्षी राज कपूर यांच्या " बॉबी (1973) चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी त्यांचा राजेश खन्ना यांच्याशी विवाह झाला. मादक सौंदर्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या डिंपल यांनी आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली.


1975 : भारतीय अभिनेत्री आणि निर्माता शिल्पा शेट्टीचा जन्म.


शिल्पा शेट्टी-कुंद्रा ही भारतीय अभिनेत्री आहे. 1993 साली 'बाजीगर' या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील 40 चित्रपटांहून अधिक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे.


1995 : ‘लोकमान्य टिळकांनी’ मंडालेच्या तुरुंगात असताना लिहून पूर्ण केलेल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे ‘गायकवाड वाड्यात’ प्रकाशन झाले.


1707 : साली मुघल शासक औरंगजेब यांच्या मृत्युनंतर त्यांचे पुत्र मुअज्जम आणि आझम शाह यांच्यात दिल्लीच्या तख्तासाठी आपआपसात युद्ध झाले. या युद्धात मुअज्जम यांनी आझम शाह यांना ठार करून दिल्लीची गादी बळकावली.


महत्वाच्या बातम्या :