Aadhaar Card Update: :  आधार कार्ड धारकांसाठी (aadhaar card) महत्त्वाची बातमी आली आहे. आजकाल घरातील गॅस सिलेंडरपासून ते बँक खाते सर्व गोष्टी आधार कार्डशी लिंक आहेत.  आज आधार कार्डचे जेवढे फायदे आहे तेवढेच तोटे देखील आहेत. जर एखाद्याला आधार क्रमांकाबद्दल माहिती मिळाली तर ते त्याचा गैरवापर देखील करू शकतात. हे  टाळण्यासाठी Virtual ID or VID हा पर्याय आहे.


या सर्व पार्श्वभूमीवर आधार कार्डचा व्हर्च्युअल आयडीचा पर्याय यूआयडीएआयने जारी केला आहे. हा आयडी देखील  16 क्रमांकाचा आहे. हा आयडी बँकिंगपासून सर्व प्रकारच्या सुविधांसाठी वैध मानला जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी ही आयडी बदलू शकता. हा Virtual ID ऑनलाईन देखील जनरेट करता येतो.  आज आपण   Virtual ID कसा जनरेट करायचा हे जाणून घेणार आहे.


असा तयार करा तुमचा आधारचा  Virtual ID



  • आधारच्या  http://uidai.gov.in/  या संकेतस्थळावर जावे लागेल

  • संकेतस्थळावर गेल्यानंतर ड्रॉपडाईनमधील माझं आधार (My Aadhaar) हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर आधार सेवा (Aadhaar Services) हा पर्याय निवडा

  • आता तुम्ही  Virtual ID generator या पर्यायावर क्लिक करा

  • वरील पर्यायावर क्लिक केल्यानंतर  एक पेज उघडेल. जेथे व्हर्च्युअल आयडी जनरेट केला जाईल

  • त्यानंतर आधार नंबर आणि कॅप्चा व्हेरीफाय करून एन्टर करा

  • त्यानंतर ‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. 

  • मोबाईलवर आलेला ओटीपी एन्टर केल्यानंतर  Generate VID या पर्यायावर क्लिक करावे

  • त्यानंतर Verify and Proceed हा पर्याय निवडावा

  • स्क्रिनवर VID sent असा मेसेज दिसेल

  • तुमचा  Unique Aadhaar Virtual ID रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर येईल. 


संबंधित बातम्या :


Aadhar Card : आधार कार्डबाबत मोठी बातमी! सरकारकडून आधार कार्डबाबतची सूचना मागे


Aadhaar Card : तुमचं आधार कार्ड खरं की खोटं? असं ओळखा; UIDAI ने सांगितली सोपी पद्धत


आधार आणि रेशन कार्ड असे करा लिंक; मिळतील अनेक फायदे