6th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 6 जून चे दिनविशेष.


6 जून : श्री. गजानन महाराज पालखी सोहळा


या वर्षीच्या आषाढीनिमित्त होणाऱ्या पंढरपूर यात्रेसाठी शेगाव येथील श्री. गजानन महाराजांची पालखी 6 जूनला प्रस्थान करणार आहे. कोरोना काळामुळे मागील दोन वर्ष पालखी सोहळा रद्द झाला होता. माक्ष, यंदा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. वारीचे यंदाचे हे 53 वे वर्ष आहे. 


6 जून : शिवराज्याभिषेक दिन.


छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने 1 जानेवारी 2021 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाला शिवप्रेमी गडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात. शिवराज्याभिषेक दिन हा 6 जूनला सुरु होतो. आणि शिवराज्याभिषेक सोहळा हा सहा दिवस चालला. 12 जूनला तो पूर्ण झाला. 


2002 : मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन. 


शांता शेळके या ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक आणि गीतकार होत्या. त्यांचे संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. मुक्ता आणि इतर गोष्टी (1944) हा त्यांचा पहिला कथासंग्रह स्वप्नतरंग (1945) ही त्यांची पहिली कादंबरी तर शब्दांच्या दुनियेत (1959) हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. 1996 मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. ह्यांखेरीज फाय फाउंडेशन मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘वाक्‌विलास’ यशवंतराव चव्हाण गदिमा सु. ल. गद्रे इ. अनेक पुरस्कार आणि मानसन्मान त्यांना लाभले. 


1929 : भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी सुनील दत्त यांचा जन्म.


सुनील दत्त ज्यांचे खरे नाव बलराज दत्त होते. ते एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक होते. याशिवाय त्यांनी भारतीय राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावली. 


महत्वााच्या बातम्या :