Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलोन मस्क हे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी ट्विटरची खरेदी केली आहे. परंतु, आता त्यांनी गुगलचे लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबला (YouTube) लक्ष्य केले आहे. एलोन मस्क यांनी यूट्यूबला एक मोठा घोटाळा म्हटले आहे. 


इलॉन मस्क यांनी ट्विटरवर यूट्यूबबद्दल एकामागून एक ट्विट केली आहेत. यातील पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, यूट्यूब ही एक नॉन स्टॉप स्कॅम जाहिरात असल्याचे दिसते. तर, दुसर्‍या ट्विटमध्ये एलोन मस्क यांनी यूट्यूबबद्दल एक मीम शेअर केला आहे. 






अलीकडेच इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्पॅम आणि फेक अकाऊंटची माहिती न देऊन ट्विटर त्यांच्या विलीनीकरणाच्या कराराचे उल्लंघन करत असल्याचा आरोप मस्क यांनी केला आहे. मस्क यांनी इशारा दिला आहे की, ते ट्विटरसोबच झालेला 44 अब्ज डॉलरच्या करार रद्द करू शकतात. 


मस्क यांनी स्पष्ट केले आहे की, "ट्विटरवरील  स्पॅम खाती 5 टक्क्यांपेक्षा कमी असतील तरच ट्विटर अधिग्रहण करार पुढे जाईल. ट्विटरवरील सुमारे 22.9 कोटी खात्यांपैकी किमान 20 टक्के खाती 'स्पॅम बॉट्स'द्वारे चालवली जात आहेत. जे ट्विटरच्या दाव्यापेक्षा 4 पट जास्त आहे."


महत्वाच्या बातम्या


Elon Musk on Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटर डील रद्द करण्याचा दिला इशारा, डेटा लपवल्याचा आरोप


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.