7th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. आज 7 ऑगस्ट म्हणजेच रविवारचा दिवस. श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्य पूजन केले जाते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 7 ऑगस्ट दिनविशेष.


आदित्य पूजन : 


श्रावणातील प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारीच नव्हे, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. नैवेद्य दाखविणे शक्य नसेल तर हरकत नाही. परंतु, कुंकुम, अक्षता, फुले वाहून अर्घ्य द्यावे. भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्रीमंत्राचा यथाशक्ती जप करावा.


इ.स. 1753 साली ब्रिटीश वस्तुसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली.


सन 1947 साली मुंबईच्या महानगर पालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली.


सन 1985 साली भारतीय बिलियर्डस खेळाडू गीत सेठी हे वर्ल्ड अ‍ॅमेच्योर बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारे तिसरे भारतीय खेळाडू ठरले.


सन 1991 साली जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या ’पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी घेण्यात आली.


सन 1912 साली भारतीय हृदयरोगाचे प्रणेते आणि मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे संचालक तसेच, ऑल इंडिया हार्ट फाउंडेशनचे संस्थापक संचालक केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्मदिन.


सन 1925 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय अनुवंशशास्त्रज्ञ आणि प्रशासक तसेच, भारतातील हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिन.


सन 1941 साली नोबल पारितोषिक विजेता भारतीय राष्ट्रगीताचे जनक कवी, संगीतकार, कलाकार आणि भारतीय उपखंडातील आयुर्वेद-संशोधक रवींद्रनाथ टागोर यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :