6th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. आज 6 ऑगस्ट आजचा दिवस म्हणजे अश्वत्थ मारूती पूजनाचा दिवस. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारूतीची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी एक ऐतिहासिक घटना घडली होती ती म्हणजे जपानची राजधानी हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबॉंब टाकला. यामुळे असंख्य लोक मृत्यूमुखी झाले. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 6 ऑगस्ट दिनविशेष.


अश्वत्थ मारूती पूजन :


श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. 


6 ऑगस्ट : हिरोशिमा दिन (Hiroshima Day).


हिरोशिमा ही जपान देशाच्या हिरोशिमा प्रांताची राजधानी आणि चुगोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर. 6 ऑगस्ट 1945 साली अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर अणुबाँब टाकला. अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर हिरोशिमामध्ये 13 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विध्वंस झाल्याचं सांगितलं जातं. यात 70,000 जण तात्काळ मृत्यूमुखी पडले तर पुढील अनेक वर्षे लोकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला.


1881 : पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पाश्चिम स्कॉटलंड येथील लॉकफील्डफार्म येथे जन्म. 


2019 : प्रसिद्ध भारतीय राजकारणी, वकील तसेच, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन.


सन 2019 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, वकील तसेच, भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन. इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला होत्या.


सन 1959 साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित “वॉटरमॅन ऑफ इंडिया” म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय जलसंधारण आणि पर्यावरणवादी तसचं ‘तरुण भारत संघ‘ चे संस्थापक राजेंद्र सिंह यांचा जन्मदिन.


सन 1970 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय वंशीय अमेरिकन चित्रपट निर्माता आणि अभिनेता मनोज नेल्लियट्टू उर्फ एम. नाईट श्यामलन यांचा जन्मदिन.


सन 1997 साली साहित्य अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते, लेखक आणि कादंबरीकार बीरेंद्र कुमार भट्टाचार्य यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :