4th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 4 मे चे दिनविशेष.


4 मे - आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस (International Firefighter’s Day)


आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस (IFFD) दर वर्षी 4 मे रोजी साजरा केला जातो. पहिल्यांदा 1999 मध्ये हा दिवस साजरा केला गेला होता. या दिनाचे मुख्य उद्दिष्ट फायर फायर्ट्सचा सन्मान आणि त्यांचे आभार मानण्यासाठी आहे. जे आपले प्राण पणाला लावून वन्यजीवांचे प्राण वाचवितात. या साहसी कामामध्ये बरेच सैनिकही मरण पावले आहेत.


1799 : श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारले गेले.


टिपू सुलतान म्हैसूरचे एक प्रसिद्ध आणि पराक्रमी राजा होते. 1782 मध्ये हैदरच्या मृत्यूनंतर टिपू म्हैसूरच्या गादीवर आले. टिपू सुलतान हे म्हैसूर राज्याचे शासक होते. त्यांना 'टायगर ऑफ म्हैसूर' असेही संबोधले जात होते. त्यांनी म्हैसूर रेशीम उद्योगाच्या वाढीस सुरुवात करणारी नवीन नाणी प्रणाली आणि कॅलेंडर तसेच नवीन जमीन महसूल प्रणालीसह नाविन्यपूर्ण प्रशासनाची मालिका सादर केली.


1854 : भारतातील पहिले टपाल तिकीट स्थापन करण्यात आले. 


1854 मध्ये टपाल विभाग स्थापन करण्यात आला, त्या सुमारास देशात सुमारे 700 टपाल कचेऱ्या (डाकघरे) कार्य करीत होत्या. 1880 साली धनप्रेष सेवा (मनीऑर्डर सेवा) चालू करण्यात आली. 


1933 : प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म.


बाबा कदम यांचा जन्म 4 मे 1929 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव वीरसेन आनंदराव कदम असे असले तरी ते आपल्या वाचक परिवारात `बाबा कदम’ म्हणूनच परिचित होते. 1965 साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. `प्रलय’ याच कादंबरीवर पुढे `देवा शपथ खरं सांगेन’ हा चित्रपटही निघाला. 


1934 : मराठी भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.


मराठी भावगीत गायकीला गझलसदृश वळण देणारे प्रथितयश गायक म्हणजे अरूण दाते. अरुण दातेंनी गायलेली ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’, ‘येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘अखेरचे येतील माझ्या, तेच शब्द ओठी’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’,‘संधिकाली या अशा’ इत्यादी गाणी खूप गाजली आणि ती आजही श्रोत्यांना आवडतात. अरूण दातेंना महाराष्ट्र पत्रकार संघाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.


1959 :  पहिला ग्रॅमी पुरस्कार आयोजित करण्यात आला.


जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा 4 मे 1959 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेल्स आणि न्यूयॉर्क ह्या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत.


1980 : आधुनिक कवी आणि नाटककार अनंत कानेकर उर्फ आत्माराम यांचे निधन.


अनंत कानेकर हे आधुनिक मराठी कवी, चतुरस्त्र लेखक आणि वृत्तपत्रकार होते. औरंगाबादच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे (1957) ते अध्यक्ष होते.  साहित्य अकादेमीचे आणि संगीत नाटक अकादमीचे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्यपद त्यांनी भूषविले आहे. 1965 साली पद्मश्री होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला. 1971 मध्ये सोव्हिएट देश नेहरु पारितोषिकाचे ते मानकरी ठरले. 


2008 : तबलावादक किशन महाराज यांचे निधन.


बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक किशन महाराज यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीरचौरा येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. भारत सरकारतर्फे पद्मश्री (1973) आणि पद्मविभूषण (2002) या पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1973), हाफिज अलीखाँ पुरस्कार (1986), उस्ताद इनायत अलीखाँ पुरस्कार (2002), दीनानाथ मंगेशकर पुरस्कार इत्यादी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. 


महत्वाच्या बातम्या :