29th June 2022 Important Events : जून (June) महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 29 जूनचे दिनविशेष.
29 जून : राष्ट्रीय सांख्यिकी दिवस (National Statistics Day)
राष्ट्रीय सांख्यिकी दिवस दरवर्षी 29 जून रोजी भारतात साजरा केला जातो. देशाचे महान सांख्यिकीशास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांची जयंती 'राष्ट्रीय सांख्यिकी दिन' म्हणून साजरी केली जाते. आर्थिक नियोजन आणि सांख्यिकीय विकासाच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल देशाच्या विधान परिषदेने प्रशांत चंद्र महालनोबिस यांची जयंती राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरी करण्याचा ठराव मंजूर केला. भारत सरकारच्या या निर्णयामुळे दरवर्षी 29 जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो.
2001 : पण्डित हृदयनाथ मंगेशकर यांना ’नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर
2007 : ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
1893 : भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युटचे संस्थापक प्रसंत चंद्र महालनोबिस यांचा जन्म.
1995 : दक्षिण कोरियातील सेऊल येथे ’सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअर’ची इमारत कोसळून 502 जण ठार तर 937 जखमी झाले.
1966 : दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार
महत्वाच्या बातम्या :