Tapsee Pannu Film Shabaash Mithu Song Fateh : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu) सध्या तिच्या आगामी ‘शाबास मिथू’ (Shabaash Mithu) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता या सिनेमातील 'फतेह' (Fateh) हे गाणं रिलीज झालं आहे. 


'फतेह' गाणं रिलीज


टी-सीरिजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलने ‘शाबास मिथू’ सिनेमातील 'फतेह' हे गाणं रिलीज केलं आहे. या गाण्यात मिताली राजचा खेळाच्या मैदानातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. गाण्यात तापसी पन्नूचा खिलाडी अंदाज पाहायला मिळणार आहे. हे गाणं गायक रॉमी आणि चरणने गायलं आहे. 


‘शाबास मिथू’ या सिनेमात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केलं आहे. या सिनेमात तापसी पन्नू व्यतिरिक्त अभिनेते विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया अवोन मुख्य भूमिकेत आहेत. 


15 जुलैला सिनेमागृहात होणार रिलीज


‘शाबास मिथू’ चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, तसेच महिला क्रिकेट संघाच्या आयुष्याभोवती फिरताना दिसणार आहे. मिताली राजने तिच्या कारकिर्दीत अनेक चढउतारांचा सामना केला, पण तिने कधीही हार मानली नाही. चार विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून, तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. ट्रेलर आणि गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा 15 जुलैला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.


तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  तापसीचा ब्लर  हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केलं आहे. तापसीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. 



संबंधित बातम्या


Shabaash Mithu Release Date : ठरलं! तापसीचा ‘शाबास मिथू’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!


Shabaash Mithu Trailer : ‘शाबास मिथू’ च्या ट्रेलरचं दिग्गजांकडून कौतुक, सचिन-सौरव म्हणाले...