28th May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 28 मे चे दिनविशेष.
1883 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती
नाशिक जिल्ह्यातील कँटोन्मेंट विरुद्धच्या चळवळीत प्रसिद्ध झालेल्या गोकुळ या गावी 28 मे 1883 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म झाला. विनायक दामोदर सावरकर ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनही संबोधले जाते. वीर सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात महत्वाची भूमिका बजावली आहे.
1923 : एन. टी. रामाराव, लोकप्रिय तेलुगू अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री
नंदामुरी तारका रामाराव अर्थात तेलगू चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते. त्यांना एनटीआर म्हणून ओळखले जाते. एनटीआर यांनी 1949 मध्ये तेलुगू चित्रपट मन देशमद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी 300 हून अधिक चित्रपट केले. अभिनयासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. चित्रपट निर्माता म्हणूनही अनेक चित्रपट केले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने रामाराव यांना 1968 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. एनटीआर यांनी तेलुगुशिवाय तमिळ आणि हिंदी चित्रपटही केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 17 वेळा कृष्णाची भूमिका केली होती. यातील 'श्री कृष्णार्जुन युद्धम', 'कर्णम' आणि 'दानवीर सूर कर्ण' हे चित्रपट खूप लोकप्रिय आहेत.
एनटीआर यांनी 1982 मध्ये एका पक्षाची स्थापना केली आणि राजकारणात प्रवेश केला. प्रसिद्ध अभिनेता असल्याने एनटीआर आणि त्यांच्या पक्षाला प्रचंड यश मिळाले. त्यामुळे ते आंध्र प्रदेशचे 10 वे मुख्यमंत्री बनले. 1983 ते 1994 या काळात ते तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
1903 : शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती
शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 रोजी झाला. ते भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे त्यांचे वडील होते.
1524 : सलीम दुसरा, ऑट्टोमन सम्राट
1660: जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
1738 : जोसेफ-इग्नास गिलोटिन, फ्रांसचा डॉक्टर.
1759 : छोटा विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
1925 : ब्युलेंट एसेव्हिट, तुर्कस्तानचा पंतप्रधान
पुण्यतिथी
1787: लिओपोल्ड मोत्झार्ट (ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक)
1961: परशुराम कृष्णा गोडे (प्राच्यविद्या संशोधक).
1982 : बळवंत दामोदर / कित्तेवाले निजामपूरकर
1994 : गणपतराव नलावडे (हिंदूसभेचे नेते व पुण्याचे माजी महापौर).
1999 : बी. विट्टालाचारी (भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते).
महत्त्वाच्या घटना
1503 : पोप अलेक्झांडर सहाव्याच्या फतव्यानुसार स्कॉटलँडचा राजा जेम्स चौथा व मार्गारेट ट्युडोरचे लग्न झाले.
1588 : एकशे तीस युद्धनौकांवर तीस हजार सैनिकांसह स्पॅनिश आर्माडा इंग्लंडवर चाल करायला
निघाला.
1774 : अमेरिकन क्रांती, पहिल्या कॉन्टिनेन्टल काँग्रेसला सुरुवात.
1830 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने इंडियन रिमुव्हल ऍक्टवर सही करून स्थानिक अमेरिकन जमातींना स्थलांतर करण्यास भाग पाडले.
1882 : जॉन मुइरने सान फ्रांसिस्कोमध्ये सियेरा क्लबची स्थापना केली.
1905 : रशिया-जपान युद्ध-त्सुशिमाची लढाई – जपानी दर्यासारंग टोगो हेहाचिरोने रशियाचे आरमार बुडवले व लढाई संपवली.
1918 : अझरबैजानने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
1936 : ऍलन ट्युरिंगने ऑन कम्युटेबल नंबर्स हा शोधनिबंध प्रकाशित केला.
1937 : फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बटन दाबून सान फ्रांसिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज वाहतूकीला खुला केला.
1937 : नेव्हिल चेंबरलेन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
1940 : दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
1996 : भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा राजीनामा
1998 : भारताने केलेल्या अणुचाचणीला उत्तर म्हणून पाकिस्तानने पाच अणुबॉम्ब उडवले.
2004 : अयाद अल्लावी इराकच्या पंतप्रधानपदी.