22nd June 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 22 जूनचे दिनविशेष.


1757 : प्लासीची लढाई सुरू झाली.


1994 : महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण.


1897 : पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकाऱ्याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.


2007 : अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले. 


1940 : दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.


1908 : महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत आणि तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा जन्म. 


1940 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. 


1893 : युनायटेड किंग्डमच्या युद्धनौका एच.एस.एस. कॅम्परडाउनने एच.एम.एस. व्हिक्टोरियाला धडक दिली. व्हिक्टोरिया 358 खलाशी आणि अधिकाऱ्यांसह बुडाली.


1983 : तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला.


महत्वाच्या बातम्या :