15 th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 15 मे चे दिनविशेष.


1817 : बंगाली समाजसुधारक देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती 


देवेंद्रनाथ टागोर यांना बंगाली समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी, गद्याकार आणि ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू म्हणून ओळखले जाते. देवेंद्रनाथ यांचा जन्म 15 मे 1817 रोजी कलकत्ता येथे त्यांच्या जोडासाँको भागातील प्रसिद्ध वाड्यात झाला. द्वारकानाथ टागोर हे राममोहन रॉय यांचे सहकारी होते. लहानपणीच देवेंद्रनाथांना राजा राममोहन रॉय यांचे सान्निध्य लाभले. बालवयात तसेच किशोरवयातही ते राममोहन रॉय यांच्या विद्यालयात शिकले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची विद्यालयात ख्याती होती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा शारदा देवींशी विवाह झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्याच्या हिंदू महाविद्यालयात झाले. राममोहन रॉय यांच्या नंतर देवेंद्रनाथ ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले व त्यांनी समाजाच्या कार्याला उत्कृष्ट वळण दिले. 


1907 : क्रांतिकारक सुखदेव थापर यांची जयंती 


भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक म्हणून सुखदेव यांना ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव सुखदेव रामलाल थापर असे आहे. सुखदेव यांचा जन्म 15 मे 1907 रोजी  लुधियानातील चौरा बाजार येथे झाला. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली होती.  
दिल्ली येथे  1928 मध्ये सर्व क्रांतिकारकांची गुप्त परिषद भरली होती. यामध्ये हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झाशी येथे घेतली. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोण त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र,भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली.  


नोव्हेंबर 1928 मध्ये लाला लजपतराय यांनी सायमन कमिशन विरोधात निदर्शनाचे नेतृत्व केले होते. निदर्शनाच्या वेळी झालेल्या लाठीमारामध्ये ते जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड म्हणून ब्रिटिश अधिकारी साँडर्स याचा गोळ्या झाडून वध करण्यात आला. या कटामध्ये सुखदेव यांचाही सहभाग असल्याने भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले.  न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. लाहोरच्या तुरुंगात 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढविण्यात आले.



1859 : फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पिएर क्युरी यांची जयंती 


भौतिकशास्त्रज्ञ  मेरी क्युरी आणि पिअर क्युरी या दोघांनी पिचब्लेंड सारखी खनिजे युरोनियम यापेक्षाही जास्त प्रमाणात उत्सर्जन करतात हे जगाला दाखवून दिले.  रेडियम हे युरेनियमपेक्षा 1650 पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला 1 क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते. 


1903  : साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांची जयंती 
रा. श्री. जोग अर्थात रामचंद्र श्रीपाद जोग यांचा जन्म  15  मे 1903 रोजी झाला. ते मराठी लेखक होते. हे 1960 मध्ये ठाणे येथे भरलेल्या 42 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


1967  : अभिनेत्री माधुरी दिक्षीत हिचा वाढदिवस 
बॉलिवूड  अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा जन्म 15 मे 1967 रोजी  मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी मातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. परंतु, ती अभिनेत्री झाली. माधुरीने अनेक हीट सिनेमे दिले आहेत. 


1857 : स्कॉटिश अंतराळतज्ञ विल्यामिना फ्लेमिंग यांची जयंती  


1350  : संत जनाबाई यांची पुण्यातिथी 
संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव. तिच्या वडिलांनी जनाबाईंना दामाशेट शिंपी यांच्या पदरात टाकले, तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. 


1729 : मराठेशाहीच्या आप्तप्रसंगी पराक्रम गाजवणारे मराठा सेनापती खंडेराव दाभाडे यांची पुण्यतिथी 


छत्रपती राजाराम महाराजांना महाराष्ट्रातून जिंजीला पोहोचविण्यात खंडेराव दाभाडे यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांनी मोगलांच्या पाठलागा पासून स्वतःचे प्राण पणाला लावून महाराजांचे संरक्षण केले. छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीहून महाराष्ट्रात पन्हाळ्या पर्यंत सुरक्षित पोहोचवण्याच्या कामात खंडेराव दाभाडे यांनी विशेष मेहनत घेतली होती. जिंजीला असताना राजाराम महाराजांचे अंगरक्षक म्हणून त्यांनी एकनिष्ठपणे सेवा केली.


1993  : तंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांची पुण्यतिथी 
1994 : जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेते ओम अग्रवाल यांची   पुण्यतिथी  
1994  : चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू  पी. सरदार यांची पुण्यतिथी  
2007 : लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांची पुण्यतिथी  
 


महत्वाचे दिवस 


1252 : पोप इनोसंट चौथ्याने पोपचा फतवा काढून ख्रिश्चन धर्म न पाळणार्‍यांचा शारिरीक छळ करण्यास मुभा दिली.
1602 : बार्थोलोम्यु गॉस्नॉल्ड हा केप कॉडला पोचणारा प्रथम युरोपीय झाला.
1718 : जेम्स पकलने मशीन गनचा पेटंट घेतला.
1730 : रॉबर्ट  वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
1795 : नेपोलियन बोनापार्टने मिलान जिंकले.
1836 : सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.
1905 : लास व्हेगास शहराची स्थापना.
1928 : मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.
1935: मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
1940 : सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.
1957 : युनायटेड किंग्डमने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
1957 : सोवियेत संघाने स्पुतनिक ३ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
1960 : सोवियेत संघाने स्पुतनिक ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
1961 : पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू.
1972 : अमेरिकेने जपानचे ओकिनावा बेट परत केले.
2000 : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू, काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह पाच जण ठार झाले.