Dhule News Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray ) यांनी वांद्रे येथील सभेत भाजपवर केलेल्या टीकेनंतर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांनी  प्रतिउत्तर दिले आहे. "उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झाले आहेत. त्यांना फक्त त्यांची खुर्ची जपायची आहे. त्यामुळे त्यांना औरंगजेबच्या कबरीवर जाऊन पाया पडा, नमाज पडा  किंवा फुले वाहा, उद्धव ठाकरेंना काहीच फरक पडत नाही. भोंग्यांच्या प्रश्नावर ते एक शब्दही बोलायला तयार नाहीत. शिवाय हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर देखील एक शब्द बोलायला ते तयार नाहीत. यामुळे त्यांचं हिंदूत्व किती बेगडी आहे हे सर्वांच्या लक्षात आलं आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. 


गिरीश महाजन आज धुळ्यामध्ये महापौर प्रदीप कर्पे यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात उपस्थित होते. लग्न समारंभानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "शिवसेना म्हणजे गटारातील मेंडक आहे, त्यांनी जगात काय चाललं आहे ते बघावं, संपूर्ण देश मोदीजींकडे बघतो आहे. मोदीजींवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आणि मोदींना तुमच्यासारख्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा टोला गिरीश महाजन यांनी लावलाय.  


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला गदाधारी म्हटले आहे. त्यांच्या या टिकेलाही गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. यांनी आता जनतेसमोर जावं, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा जनता यांना कोण गदाधारी आहे हे दाखवून देईल, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.


गिरीश महाजन म्हणाले, " शिवसेनेकडून सध्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरू  आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आताची शिवसेना कशी प्रबळ आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने सत्तेवर बसलात आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत तुम्ही हात मिळवणी केली. आमच्यासोबत युती होती म्हणून तुमचे 55 आमदार निवडून येऊ शकले. युती नसती तर तुमचे पंचवीस आमदार देखील निवडून आले नसते. शिवसेनेने आता त्यांचे चार खासदार तरी निवडून आणून दाखवावेत. 


महत्वाच्या बातम्या


Uddhav Thackeray speech : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे


भाजपचं हिंदुत्व खोटं, म्हणून सोडलं; उद्धव ठाकरेंची यांची तोफ धडाडली