Wheat Export Ban: भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीवर जी-7 देशांनी टीका केली आहे. एएफपीनुसार, शनिवारी सात औद्योगिक देशांच्या समूहाच्या कृषी मंत्र्यांनी भारताच्या निर्णयाचा निषेध केला. जर्मन कृषी मंत्री केम ओझदेमीर यांनी स्टटगार्ट येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “जर प्रत्येकाने निर्यात बंदी करण्यास किंवा बाजारपेठ बंद करण्यास सुरुवात केली तर हे संकट अधिक गंभीर होईल.” G-7 देशांमध्येमध्ये ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
जी- 7 औद्योगिक राष्ट्रांच्या मंत्र्यांनी जगभरातील देशांना निर्बंधात्मक कारवाई न करण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे उत्पादन बाजारांवर आणखी दबाव येऊ शकेल. ओझदेमीर म्हणाले की,"आम्ही भारताला G20 सदस्य म्हणून आपली जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करतो." जूनमध्ये जर्मनीमध्ये होणाऱ्या G7 परिषदेत या विषयावर जर्मन कृषी मंत्री शिफारस करतील, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
भारताने गव्हाच्या निर्यातीवर घातली बंदी
देशांतर्गत वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून भारताने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. अधिकृत अधिसूचनेतून ही माहिती मिळाली आहे. दरम्यान, डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने 13 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे, "ज्या मालासाठी या अधिसूचनेच्या तारखेला किंवा त्यापूर्वी अपरिवर्तनीय पत्रे (LOC) जारी करण्यात आली आहेत, अशा मालाच्या निर्यातीस परवानगी दिली जाईल."
डीजीएफटीने असेही स्पष्ट केले आहे की, भारत सरकारने इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या सरकारच्या विनंतीनुसार गव्हाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: