12th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 12 मे चे दिनविशेष.


1854 : जागतिक परिचारिका दिन


जगभरात 12 मे हा जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day) साजरा केला जातो. फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. त्यांच्याच स्मरणार्थ जागतिक परिचारिका हा दिन साजरा केला जातो. युद्धकाळात फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी जखमी आणि आजारी सैनिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र एकत्र केले. सैनिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला त्या पत्र पाठवत असत. रात्रीच्या वेळी हातात लालटेन घेऊन त्या रुग्णांची विचारपूस करत असत, त्यांची देखभाल करायच्या. यामुळे सैनिक प्रेम आणि आदराने त्यांना 'लेडी विद लॅम्प' म्हणायचे. 1856 मध्ये युद्धानंतर परतल्यानंतर याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.


1907 : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक विजय भट यांचा जन्म. 


विजय भट्ट हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज निर्माता / दिग्दर्शक आणि पटकथा लेखक होते. विजय भट्ट यांनी ‘राम राज्य’,‘बैजू बावरा’, ‘गूंज उठी शहनाई’ आणि ‘हिमालय की गोद में’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे.


1952 : प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.


1998 : भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट ॲंड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.


2010 : एस. एच. कपाडीया यांनी भारताचे 38 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.


महत्वाच्या बातम्या :