11th July 2022 Important Events : 11 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
11th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 11 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.
11th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 11 जुलै म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day). जागतिक लोकसंख्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 11 जुलैचे दिनविशेष.
11 जुलै : World Population Day (जागतिक लोकसंख्या दिन)
11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलनेे 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
1994 : रणांगणावरील असामान्य कामगिरीबद्दलचा ’परमवीर चक्र’ हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे मेजर (निवृत्त) रामराव राघोबा राणे यांचे निधन. हा सन्मान मिळवणारे ’बॉम्बे सॅपर्स’चे आणि महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते.
1659 : साली मुघल सेनापती अफजलखान यांच्या सोबत युद्ध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून निघून प्रताप गडावर गेले.
2003 : साली पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक, नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचे निधन.
1953 : साली गोवा राज्याचे प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि माजी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री, उद्योगमंत्री, ऊर्जामंत्री आणि अवजड उद्योग मंत्री तसचं, गोवा राज्याचे मुख्यमंत्री सुरेश प्रभू यांचा जन्मदिन.
महत्वाच्या बातम्या :