10th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 10 मे चे दिनविशेष.


1526 : पानिपतची लढाई जिंकल्यानंतर बाबरने देशाची तत्कालीन राजधानी आग्रा येथे पाऊल ठेवले.


1937 : आधुनिक मराठी कवी ग्रेस यांचा जन्म.


माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस हे आधुनिक मराठी कवी होते. ग्रेस हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील एक अग्रगण्य कवी होते. "वाऱ्याने हलते रान" ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी संध्याकाळच्या कविता (1967) आणि राजपुत्र आणि डार्लिंग (1974) हे त्यांचे दोन काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध झाले. 


1993 : जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट दोनदा सर करणारी संतोष यादव ही पहिली महिला गिर्यारोहक ठरली.


1994 : दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.


वर्णभेद संपविण्याच्या मोहिमेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिलेले नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. 1993 मध्ये, त्यांना एफ. डब्ल्यू. डी क्लर्क यांच्यासोबत संयुक्तपणे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.


महत्वाच्या बातम्या :