एक्स्प्लोर
Advertisement
इंग्लिश बोलताना आणि लिहिताना हमखास होणाऱ्या दहा चुका!
पण दुसऱ्या भाषेत संवाद साधताना काही अडचणी तर येताताच. त्यातही जर ती भाषा इंग्लिश असेल तर बऱ्याचदा आपला सोप्या शब्दांमध्ये घोळ होतो.
मुंबई : आपण आपल्या मातृभाषेत उत्तम संवाद साधतो. पण दुसऱ्या भाषेत संवाद साधताना काही अडचणी तर येताताच. त्यातही जर ती भाषा इंग्लिश असेल तर बऱ्याचदा आपला सोप्या शब्दांमध्ये घोळ होतो. संभाषण करताना किंवा चॅट करताना काही चुका करतो, ज्या फारच क्षुल्लक वाटू शकतील. त्यामुळे इंग्लिश लिहिताना किंवा बोलताना होणाऱ्या दहा चुका आम्ही आज सांगणार आहोत, ज्या सहजरित्या टाळता येतील.
1. Revert back : रिव्हर्टचा (Revert)अर्थ परत येणं किंवा परत करणं. त्यामुळे इथे बॅक (back) लावण्याची कोणतीही गरज नाही.
2. Cousin brother/Cousin sister : केवळ कझिन (cousin) म्हणणंच योग्य आहे. त्याचा अर्थ चुलत भाऊ, चुलत बहिण, मामे भाऊ किंवा मामे बहिण असा आहे. त्यामुळे कझिनसोबत (cousin) ब्रदर (brother) किंवा सिस्टर (sister) लावण्याची आवश्यकता नाही.
3. Real brother/Real sister : एकाच पालकांचे मुलं असल्यावर तुमच्या भाऊ किंवा बहिणीला फक्त brother/sister/sibling म्हणा. काका, मामा आत्या किंवा मावशीच्या मुलगा आणि मुलीसाठी कझिनचा (cousin) वापर करा.
4. Fast friend : हे चुकीचं इंग्लिश आहे. जर कोणी तुमचा जवळचा मित्र/मैत्रीण असेल तर तुम्ही त्याला/तिला (क्लोझ फ्रेण्ड) close friend म्हणू शकता.
5. Your/you’re : युवरचा (Your) अर्थ एखादी गोष्टी तुमची आहे. तर You’re हा यु आरचा शॉर्ट फॉर्म आहे.
6. It’s/Its : इट्स (It’s) हा इट इज (It is)चा शॉर्ट फॉर्म आहे. तर Its चा अर्थ तुम्ही पुरुष किंवा स्त्री दर्शवत नाही. उदाहरणार्थ Its हे His आणि Her सारखं आहे. पण तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत नसाल तेव्हा Its चा वापर केला जातो.
7. More better : बेटर (better) मूळातच (गुड) good चा कम्पॅरेटिव्ह फॉर्म (comperative form) आहे. त्याच्याआधी (मोअर) more लावण्याची कोणतीही गरज नाही.
8. Myself : मायसेल्फने (myself) ओळख करुन देणं : स्वत:ची ओळख करुन देण्यासाठी I am किंवा my name is चा वापर करा.
9. अनेकवचन करण्यात चूक : चाईल्डचं (child) अनेकवचन children आहे. त्याचप्रकारे ox चं अनेकवचन oxen आहे. childs, childrens, oxes किंवा oxens लिहिणं चुकीचं आहे.
10. Pass out : शाळा किंवा कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आहे, असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर ग्रॅज्युएटेड (graduated) किंवा कम्प्लीट माय डिग्री (completed my degree) म्हणा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement