एक्स्प्लोर

UCO Bank Security Recruitment 2022 : बँकेत सरकारी नोकरी करायचीये? मग लगेच इथे अर्ज भरा, उरलेत फक्त काही दिवस

UCO Bank Security Recruitment 2022 : या पदांसाठी निवड IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल.

UCO Bank Security Recruitment 2022 : तुम्हाला बँकेत सरकारी नोकरी करायची असेल तर अर्जासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. UCO बँकेनं सुरक्षा अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.ucobank.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे. उमेदवारांना त्यापूर्वी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 10 पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता 

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात.

रिक्त पदांचा तपशील 

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 10 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाईटवर जाण्याचा आणि संपूर्ण तपशील वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

वेतनश्रेणी 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 36000 ते 63840 रुपये प्रति महिना वेतन दिलं जाईल.

निवड प्रक्रिया 

या पदांसाठी निवड IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.

कसा कराल अर्ज? 

इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी बँकेची अधिकृत वेबसाईट www.ucobank.com ला भेट द्यावी. 
आता "सुरक्षा अधिकाऱ्याच्या पदांवर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा" ही लिंक उघडण्यासाठी RECRUITMENT वर क्लिक करा.
त्यानंतर "Apply Online" या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर नवीन स्क्रीन उघडेल.
त्यानंतर फॉर्म भरा आणि नंतर फी भरा.
अर्ज भरुन पूर्ण झाल्यानंतर तो एकदाच तपासा, जर काही चूक असेल तर ती दुरुस्त करा.
त्यानंतर ते सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट जतन करा.

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

FSSAI मध्ये दहावी-बारावी आणि पदवीधरांसाठी रिक्त जागा, प्रतिमाह 2 लाखांहून अधिक वेतन मिळवण्याची संधी

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget