एक्स्प्लोर

उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी, 1000 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु,  कसा कराल अर्ज? 

न्यायालयात नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तेलंगणा उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे.

Jobs in High Court: न्यायालयात नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तेलंगणा उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. कोर्ट मास्टर, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनोग्राफर, टायपिस्ट, कनिष्ठ सहाय्यक, परीक्षक आणि इतर अनेक पदांसाठी उच्च न्यायालयाने 1000 हून अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 8 जानेवारी 2025 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

रिक्त पदांची संख्या

तेलंगणा उच्च न्यायालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विविध पदांसाठी एकूण 1000 हून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळं कोर्टात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना ही मोठी संधी आहे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. रिक्त असणाऱ्या पदांचा सविस्तर तपशील देखील तेलंगणा उच्च न्यायालयानं दिला आहे. या पदांमध्ये कोर्ट मास्टरच्या 12, कॉम्प्युटर ऑपरेटरच्या 11, असिस्टंटच्या 42, परीक्षकाच्या 24, टायपिस्टच्या 12, कॉपीिस्टच्या 12, सिस्टम ॲनालिस्टच्या 20, ऑफिस सबऑर्डिनेटच्या 75, स्टेनोग्राफर ग्रेड IIच्या 45, कनिष्ठ सहाय्यकच्या 340 पदांचा समावेश आहे. फील्ड असिस्टंटसाठी 66, प्रोसेस सर्व्हरसाठी 130, रेकॉर्ड असिस्टंटसाठी  52 आणि कार्यालय अधीनस्थांच्या 479 पदांचा समावेश आहे. दरम्यान, अर्ज करण्याची प्रक्रिया ही येत्या 8  जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी असणार आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिकची माहिती हवी आहे, त्यांनी tshc.gov.in या वेबसाईटवर पाहावी. या वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

कसा कराल अर्ज?

सर्व प्रथम तेलंगणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट (tshc.gov.in) वर जा.
मुख्यपृष्ठावर दिलेल्या सूचनेवर क्लिक करा.
वेगवेगळ्या पोस्टसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
आवश्यक माहिती भरून नोंदणी क्रमांक मिळवा.
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर, एक अद्वितीय क्रमांक तयार होईल.
भविष्यातील वापरासाठी अर्ज डाउनलोड करा आणि मुद्रित करा.
वयोमर्यादा: या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांचे वय 18 ते 34 वर्षांच्या दरम्यान असावे. 1 जुलै 2024 रोजी वयाची गणना केली जाईल.

लेखी परीक्षा

काही पदांसाठी संगणकावर आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत एकूण 90 प्रश्न असतील, त्यापैकी 50 प्रश्न सामान्य ज्ञानाशी संबंधित असतील आणि 40 प्रश्न सामान्य इंग्रजीशी संबंधित असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल आणि उमेदवारांना परीक्षेसाठी 120 मिनिटे मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget