SECR Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली बातमी आहे. रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये सुमारे एक हजारहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने शिकाऊ पदांवरील भरती करण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 24 मे 2022 पूर्वी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. शिकाऊ पदांसाठी सुरू असलेल्या भरतीसाठी 25 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
1033 पदांची भरती
या भरतीअंतर्गत वेल्डर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, मशिनिस्ट आणि फिटरसह अनेक ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 1033 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावी. तर सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अशी असेल निवड प्रक्रिया?
या पदांवरील भरतीसाठी उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.
येथे करा अर्ज
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 24 मे 2022 पर्यंत apprenticeshipindia.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रेल्वेच्या ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :
- ICMR Recruitment 2022 : आयसीएमआरमध्ये नोकरीची संधी, येथे करा अर्ज, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
- MPSC Exam 2021 : मोठी बातमी! एमपीएससी मुख्य परीक्षेचं प्रवेश प्रमाणपत्र जारी
- Job Majha : पाटबंधारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; जाणून घ्या भरतीबाबत सर्व माहिती
- Indian Navy Jobs 2022 : भारतीय नौदलात नोकरीची संधी; कोणत्या पदांसाठी, किती वेतन मिळणार? जाणून घ्या