SAI Jobs 2022 : भारतीय क्रिडा विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय क्रिडा प्राधिकरणाने (Sports Authority of India) नोकरीसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकुण 50 पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार sportsauthorityofindia.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरती अंतर्गत अर्ज करण्याची 12 मे 2022 म्हणजेच आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2022 पासून सुरू झाली.


महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 27 एप्रिल 2022
अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख : 12 मे 2022


शैक्षणिक पात्रता 
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराकडे विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर (Post Graduation) पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवार कोणत्याही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेला असावा.


अशी आहे निवड प्रक्रिया
या रिक्त पदांवर उमेदवारांची भरती मुलाखतीच्या आधारे केली जाईल. भरतीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.


अर्ज कसा कराल? जाणून घ्या



  • इच्छुक उमेदवार भारतीय क्रिडा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईट sportsauthorityofindia.nic.in वर अर्ज करु शकतात.

  • यानंतर होम पेजवर लेटेस्ट अपडेट्सच्या पर्याय निवडा.

  • त्यानंतर Jobs पर्याय निवडा.

  • येथे तुम्हाला उमेदवाराला SAI च्या पर्याय निवडावा लागेल.

  • उमेदवाराने सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.

  • यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.


महत्त्वाच्या इतर बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI