India Post Payments Bank Recruitment 2022 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB, India Post Payments Bank) मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती सुरू आहे. यामाध्यमातून बँकेच्या देशभरातील शाखांमध्ये रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया काल म्हणजेच, 10 मे 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार अधिकृत वेबसाईट ippbonline.com वर जाऊन अर्ज करु शकतात. नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 निश्चित करण्यात आली आहे. भरती अभियानांतर्गत वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण 650 पदांची भरती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या कामांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.


महत्त्वाच्या तारखा :



  • ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : 10 मे 2022

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2022

  • अर्ज शुल्क जमा करण्याची तारीख : 10 मे ते 20 मे 2022

  • परीक्षेची तारीख : जून 2022

  • परीक्षेचं हॉल तिकीट जारी होण्याची तारीख : अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर 10 दिवसांनी 


वेतन श्रेणी 


इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकमध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना 30000 रुपये प्रतिमाह पर्यंत वेतन दिलं जाईल. 


शैक्षणिक पात्रता 


या पदांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवारांना किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असावा. दुसरीकडे, जर आपण पदांसाठी वयोमर्यादेबद्दल बोललो, तर ती 20 ते 35 वर्षे निश्चित केली आहे.


निवड प्रक्रिया 


या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवरांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल. उमेदवारांना सल्ला देण्यात येत आहे की, कोणत्याही अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ippbonline.com वर जाऊन संपूर्ण माहिती वाचून घ्या. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI