NEET PG 2022 Admit Card Released Soon : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) कडून लवकरच नीट पीजी (NEET PG) परीक्षेसाठी हॉल तिकीट (प्रवेशपत्र) जारी कले जाणार आहेत. NEET PG परीक्षा 21 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत घेतली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेचे हॉल तिकीट बॅचनिहाय जारी करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी NEET PG साठी अर्ज केला आहे, त्यांना NBEMS च्या natboard.edu.in आणि nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटवरुन हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे. 


बोर्डानं जारी केलेल्या अधिसूचनेत, बोर्डानं परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये बोर्डानं विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेपूर्वी परीक्षेच्या ठिकाणी पोहोचण्यास सांगितलं आहे. तसेच, परीक्षा केंद्रात कोणत्याही परिस्थितीत उशीरा प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय विद्यार्थ्यांनी ओळखपत्र आणि हॉल तिकीटची प्रिंट घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचावं लागणार आहे. या कागदपत्रांशिवाय परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षार्थींना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रतिबंधित वस्तू घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं बोर्डानं स्पष्ट केलं आहे. 


हॉल तिकीट कसं कराल डाऊनलोड? 



  • नीट पीजी (NEET PG) परीक्षेचं हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी परीक्षार्थींनी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर भेट द्या. 

  • त्यानंतर हॉल तिकीट डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.

  • लॉगिन करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती तिथे द्या. 

  • हॉल तिकीट पाहण्यासाठी सबमिट लिंकवर क्लिक करा. 

  • आता तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 

  • तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड होईल. 

  • डाऊनलोड झालेल्या हॉल तिकीटची प्रिंट काढा 

  • लक्षात ठेवा, हॉल तिकीटची प्रिंट काढायला विसरु नका. हॉल तिकीटशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाहीये. त्यामुळे आठवणीने हॉल तिकीटची प्रिंट काढा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI