Recruitment 2022 : नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वेसह बँकिंग क्षेत्रात नोकर भरती होणार आहे. यासाठी विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या जाहिरातीनुसार, अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागांची भरती होणार आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय सहकारी बँकेच्या मुंबई शाखेसाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 



दक्षिण पूर्व मध्य रेल्वे


पोस्ट : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)


शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ITI


एकूण जागा : 1 हजार 33


वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022


अधिक तपशील - secr.indianrailways.gov.in


 
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)


एकूण 35 जागांसाठी भरती होत आहे.


पहिली पोस्ट : सिस्टम ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech, 2 ते 10 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 07


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022


अधिक तपशील - sbi.co.in 


 
दुसरी पोस्ट  : एक्झिक्युटिव्ह


शैक्षणिक पात्रता :  B.E/B.Tech , दोन वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 17


अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 17 मे 2022


अधिक तपशील - sbi.co.in 


 
तिसरी पोस्ट : सिनियर एक्झिक्युटिव्ह


शैक्षणिक पात्रता :  B.E/B.Tech, चार वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 10


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022


अधिक तपशील - sbi.co.in 


  
चौथी पोस्ट : सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह


शैक्षणिक पात्रता -  B.E/B.Tech , आठ वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 01


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022


तपशील - sbi.co.in  (या वेबसाईटवर गेल्यानंतर home मध्ये careers वर क्लिक करा. Join sbi मध्ये current openings वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातील  जाहिरातीची लिंक दिसेल. Advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)



राष्ट्रीय सहकारी बँक,  मुंबई


पोस्ट : लिपिक


शैक्षणिक पात्रता : पदवीधर


एकूण जागा : 12 


वयोमर्यादा – 35 वर्षांपर्यंत


नोकरीचं ठिकाण : मुंबई


ऑनलाईन पद्धतीन तुम्हाला अर्ज करायचा आहे.


तपशील - www.nationalbank.co.in (या वेबसाईटवर गेल्यानंतर Recruitment for the post of Clerk ही लिंक दिसेल. क्लिक करा. Advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022 


महत्वाच्या बातम्या