GST Collection : देशात  वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर आतापर्यंतचे सर्वाधिक विक्रमी कर संकलन एप्रिल 2022 मध्ये झाले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्याच महिन्यात विक्रमी कर संकलन झाले असून सरकारच्या तिजोरीत एक लाख 67 हजार 540 कोटी जमा झाले आहेत. याआधी मार्च महिन्यात सर्वाधिक कर संकलन झाले होते. 


अर्थ मंत्रालयाने ट्वीटरवरून याबाबतची माहिती दिली. अर्थ मंत्रालयाने म्हटले की, जीएसटी कर संकलनाने उच्चांक गाठला आहे. मार्च महिन्यात एक लाख 42 हजार 095 कोटींची कमाई केली होती. यापेक्षाही अधिक कर संकलन एप्रिल महिन्यात झाले आहे. 


 






 


एप्रिल 2022 मध्ये सरकारला 1,67,540 कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या रुपात मिळाला आहे. यामध्ये सीजीएसटी  33,159 कोटी रुपये असून एसजीएसटीचा वाटा 41,793 कोटी रुपये आहे. तर IGST चा वाटा हा 81,939  कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय उपकरांचा वाटा 10,649 कोटी रुपयांचा आहे.  आयात करण्यात आलेल्या वस्तूंवरील करातून 857 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 


मागील वर्षी म्हणजे एप्रिल 2021 च्या तुलनेते या वर्षी जीएसटी करात 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय, या वर्षी आयात करण्यात आलेल्या वस्तूंवरील  करात 30 टक्क्यांची वाढ दिसून आली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: