Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
>> महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., बीड
पोस्ट – इलेक्ट्रिशियन, वायरमन
शैक्षणिक पात्रता – ITI-NCVT
एकूण जागा – ९४ (यात इलेक्ट्रिशियनसाठी ४७ आणि वायरमनसाठी ४७ जागा आहेत.)
अर्ज करण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, विद्युत भवन, जालना रोड, बीड
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ मे २०२२
तपशील - www.mahadiscom.in
> महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं.
एकूण ४१ जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट – मुख्य अभियंता (chief engineer)
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी, १५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - ७
वयोमर्यादा – ५० वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ मे २०२२
तपशील - www.mahagenco.in
> दुसरी पोस्ट – उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी, १४ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – ११
वयोमर्यादा – ४८ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ मे २०२२
तपशील - www.mahagenco.in
> तिसरी पोस्ट – अधिक्षक अभियंता (Superintending Engineer)
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी, १२ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – २३
वयोमर्यादा – ४५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ मे २०२२
तपशील - www.mahagenco.in
अर्ज पाठवण्याचा पत्ता: Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga,Mumbai – 400 019
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ मे २०२२
तपशील - www.mahagenco.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Revised - Direct Recruitment for various posts in “Technical Cadre” on Regular basis - Advt. No. 01/2022. या लिंकमधली जाहिरातीची लिंक डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)