RECPDCL Recruitment 2022 : तुम्ही नोकरी शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. REC Power Development & Consultancy Limited ने कार्यकारी पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत साइट recpdcl.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची 11 मे ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.


RECPDCL Recruitment 2022 : किती पदांची भरती केली जाईल?


या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेमध्ये 9 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ज्यासाठी उमेदवारांना त्यांच्यासोबत आधार कार्ड/जन्मतारीख प्रमाणपत्र आणि 10वीचं प्रमाणपत्र आणावं लागेल.


किती पदांसाठी भरती; जाणून घ्या



  • वरिष्ठ कार्यकारी (टेक) : 1 पद

  • कार्यकारी (टेक) : 5 पदं

  • उप कार्यकारी (टेक) : 3 पदं


आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव


अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये नियमित BE/B.Tech किंवा मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून समकक्ष असणं आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना 10 वर्ष ते 13 वर्षांपर्यंतचा अनुभव असावा. अर्ज केलेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केल्यानंतर कॉर्पोरेट ऑफिस, RECPDCL येथे मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. याशिवाय ऑनलाइन माध्यमातूनही मुलाखत घेता येईल. या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी इच्छुक उमेदवार आरईसीपीडीसीएलच्या अधिकृत वेबसाइटला recpdcl.in भेट देऊन जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI